Wed, Sept 27, 2023

राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन
राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन
Published on : 31 May 2023, 3:44 am
राज्य मानांकन
कॅरम स्पर्धेचे आयोजन
कोल्हापूर, ता. ३१ : श्री दत्तराज चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ७ व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन नृसिंहवाडी येथे करण्यात आले आहे. ही स्पर्धा १० ते १२ जून दरम्यान पुरुष व महिला या दोन गटांत एकेरी स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील नामवंत खेळाडू सहभागी होत आहेत.
उपांत्यपूर्व फेरीपासून ब्रेक टू फिनीश व ब्लॅक टू फिनीश करणाऱ्या खेळाडूंना विशेष बक्षीस दिले जाणार आहे. सहभागी इच्छुक खेळाडूंनी कोल्हापूर जिल्हा कॅरम असोसिएशनचे सचिव विजय जाधव यांच्याकडे २ जून दुपारी तीनपर्यंत नोंदवावीत, असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विवेक घाटगे यांनी केले आहे.