राणे व्याख्यानमाला

राणे व्याख्यानमाला

06201
कोल्हापूर : प्रिन्सिपॉल अमरसिंह राणे व्याख्यानमालेत बोलताना प्रा. डॉ. अशोक चौसाळकर. (नितीन जाधव : सकाळ छायाचित्रसेवा)

शिवरायांच्या प्रेरणेतून
ब्रिटिशांविरोधात संघर्ष
डॉ. अशोक चौसाळकर; राणे स्‍मृती व्‍याख्‍यानमाला
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३१ : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना मूर्तरुपात आणली. त्यांच्या पश्चात औरंगजेबाला स्वराज्य घेता आले नाही. मराठा योध्यांनी १४० वर्षे स्वराज्य झुंजवत ठेवले. शिवरायांच्या पराक्रमी इतिहासातून प्रेरणा घेऊन ब्रिटिशांच्या विरोधात संघर्ष झाला, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांनी केले. राजर्षी शाहू स्‍मारक भवन येथे आयोजित प्रिन्‍सिपल अमरसिंह राणे स्‍मृती व्‍याख्‍यानमालेत बुधवारी ‘छत्रपती शिवरायांची राजनिती’ या विषयावर डॉ. चौसाळकर बोलत होते. अध्‍यक्षस्‍थानी डॉ. बी. डी. खणे होते. भारतीय इतिहास संकलन समितीतर्फे या व्याख्‍यानमालेचे आयोजन करण्‍यात आले होते.
डॉ. चौसाळकर म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील संत परंपरेतून हिंदवी स्वराज्याची संकल्पना पुढे आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माआधीचा काळ कठीण होता. आदिलशाही, मुघल आणि सिद्धी यांनी महाराष्ट्राची राखरांगोळी केली होती. अशा काळात जिजाऊ आणि शहाजीराजे यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य आणि पराक्रमावर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या पश्चातही औरंगजेबाला स्वराज्य घेता आले नाही. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि ताराराणी यांनी स्वराज्य १४० वर्षे झुंजवत ठेवले. शिवरायांच्या प्ररणेमुळेच मराठे अटकेपार गेले. शिवरायांपासून प्रेरणा घेऊनच महाराष्ट्रात ब्रिटिशांविरोधात संघर्ष उभा राहिला.’’ कार्यक्रमावेळी दुर्ग स्‍थापत्‍य शोधनिबंध संग्रह या पुस्‍तकाचे प्रकाशन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. या वेळी सुमित्रा जाधव, डॉ. अमर आडके, डॉ. अरिन हर्डीकर, डॉ. केशव हरेल उपस्‍थित होते. डॉ. सुप्रिया जोशी, उमाकांत राणिंगा यांनी सुत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com