बेकनाळमध्ये बसफेरीची सैनिक संघटनेची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेकनाळमध्ये बसफेरीची सैनिक संघटनेची मागणी
बेकनाळमध्ये बसफेरीची सैनिक संघटनेची मागणी

बेकनाळमध्ये बसफेरीची सैनिक संघटनेची मागणी

sakal_logo
By

gad11.jpg
06257
गडहिंग्लज : बेकनाळ बसफेरी सुरु करण्याबाबत आजी-माजी बहुउद्देशीय सैनिक संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले.
------------------------------
बेकनाळमध्ये बसफेरीची
सैनिक संघटनेची मागणी
गडहिंग्लज : बेकनाळ (ता. गडहिंग्लज) गावात सकाळच्या सत्रात एक व सायंकाळच्या सत्रात एक अशा दोन बसफेऱ्या सुरु कराव्यात, अशी मागणी आजी-माजी बहुउद्देशीय सैनिक संघटनेतर्फे केली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) येथील आगार व्यवस्थापकांना याबाबतचे निवेदन दिले आहे. आगार व्यवस्थापक श्री. रणे यांनी निवेदन स्वीकारले. संघटनेचे अध्यक्ष नामदेव जगताप, कुमार पाटील, सूर्यकांत पाटील, संजय जगताप, भैरु मोदर, विठोबा धबाले, श्रीधर सावंत आदींनी हे निवेदन दिले.