
बहुजन पतसंस्थेला नफा
बहुजन शिक्षण संस्थेला १.२२ कोटींचा नफा
कोल्हापूर ः कोल्हापूर जिल्हा बहुजन माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थेला २०२२ - २३ आर्थिक वर्षात एक कोटी २२ लाख इतका ढोबळ नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ मांडरे यांनी दिली. आर्थिक वर्षात संस्थेने प्रगती साधली असून ठेवी २९ कोटींवर, तर कर्जाचे वाटप २८ कोटी रूपयांवर पोचले आहे. संस्थेच्या सर्व प्रकारच्या कर्जास १०.५ टक्के इतका व्याजदर होणार आहे. तसेच १ वर्षांच्या ठेवीसाठी ८ टक्के व २५ महिन्यांसाठी ८.१० टक्के इतका व्याजदर केला आहे. मासिक सभेत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष विकास कांबळे, समिती सदस्य राहुल माणगांवकर, ज्येष्ठ संचालक प्रकाश पोवार, संचालक नंदकुमार कांबळे, रविंद्र मोरे, दिलीप वायदंडे, संजय कांबळे, रघुनाथ कांबळे, योगेश वराळे, बापू कांबळे, दत्तात्रय टिपुगडे, विलास दुर्गाडे, सुजाता भास्कर, सुजाता देसाई, आण्णा पाटील, व्यवस्थापक बाबुराव साळोखे उपस्थित होते.