हरपवडेत अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हरपवडेत अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण
हरपवडेत अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण

हरपवडेत अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण

sakal_logo
By

ajr14.jpg
06256
हरपवडे (ता. आजरा) ः येथे वैशाली गुरव यांच्याहस्ते पुरस्कार उमाताई संकपाळ यांनी पुरस्कार स्वीकारला. या वेळी ग्रामपंचायत सदस्य व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
---------------
हरपवडेत अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण
आजरा, ता. १ ः हरपवडे (ता. आजरा) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी झाली. हरपवडे ग्रामपंचायतीमध्ये सरपंच वैशाली देवदास गुरव यांच्याहस्ते अहिल्यादेवी होळकरांच्या प्रतिमेचे पुजन झाले. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कारचे वितरण झाले.
बचतगट चळवळीतील प्रमुख श्रीमती उमाताई सुरेश संकपाळ यांना सरपंच सौ. गुरव यांच्याहस्ते पुरस्कार देवून सन्मानित केले. श्रीमती संकपाळ यांनी महिलांच्या अडचणी जाणुन घेऊन बचत गट स्थापन केले आहेत. त्या सतत महिलांना स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन व प्रोत्साहन देत असतात. त्यांच्या कामाची दखल घेवून पुरस्कार दिला. उपसरपंच श्रीराम पाटील, ग्रामपंचायत सदस्य गोविंद गुरव, संजय गुरव, कविता गुरव, रेश्मा मुलानी, सरिता चव्हाण, विमल कांबळे, पोलिस पाटील, निलोफर मुलानी, ग्रामसेवक ज्ञानेश्वर काळे आदी उपस्थित होते.