अतिक्रमणधारकांना आता नाही वाली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अतिक्रमणधारकांना आता नाही वाली
अतिक्रमणधारकांना आता नाही वाली

अतिक्रमणधारकांना आता नाही वाली

sakal_logo
By

अतिक्रमणधारकांना आता नाही वाली
पुन्हा लागू झालेत नोटीसा; ग्रामपंचायत निवडणुकांच्या तोंडावर झाली होती आंदोलने
अवधूत पाटील : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १ : गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढून घेण्यासाठी महसूल विभागातर्फे पुन्हा नोटीसा दिल्या आहेत. त्यामुळे अतिक्रमणधारकांची अस्वस्थता वाढली आहे.
गतवेळी नोटीस लागू झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. ग्रामपंचायत निवडणुका तोंडावर असल्यानेच त्यांनी ही भूमिका घेतली होती का, असे म्हणण्यास वाव मिळत आहे. कारण, यावेळी नोटीसा लागू झाल्यानंतर अतिक्रमणधारकांना कोणी वाली नसल्याची परिस्थिती तालुकास्तरावर दिसून येत आहे.
गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याचे आदेश गतवर्षी उच्च न्यायालयाने दिले. त्यानंतर अतिक्रमणधारकांना नोटीसा बजावल्या होत्या. गतवर्षी ऑक्टोबरमध्ये प्रक्रिया सुरु झाली होती. गडहिंग्लज तालुक्यातील १७५९ अतिक्रमणधारकांना नोटीस लागू केल्या होत्या. त्यानंतर खळबळ उडाली होती. अनेकांची घरेच अतिक्रमित जागेत असल्याचे समोर आले होते. याविरोधात सर्वच राजकीय पक्षांनी आवाज उठवला. अतिक्रमणधारकांची बाजू घेत प्रांत कार्यालयावर मोर्चे निघाले होते. सर्वत्रच राजकीय पातळीवर विरोध वाढल्याने अतिक्रमण काढण्याची मोहिम थंडावली होती.
दरम्यान, आता गायरान अतिक्रमण काढण्याची जबाबदारी महसूल विभागाकडे देण्यात आली आहे. त्यांच्याकडून सर्व अतिक्रमणधारकांना नव्याने नोटीसा लागू केल्या आहेत. ६० दिवसांत स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, आता तालुकास्तरावरील एकाही राजकीय पक्षाने याविरोधात आवाज उठवलेला दिसत नाही. ना त्यांची बाजू मांडण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे अतिक्रमणधारकांना कोणी वाली नसल्याचे दिसून येत आहे. गतवेळी अतिक्रमणधारकांना नोटीसा लागू झाल्या त्यावेळी तोंडावर तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका होत्या. यातील बहुतांश गावातील गायरानावर अतिक्रमणे आहेत. निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना सांभाळण्यासाठीच त्यावेळी राजकीय पक्षांनी भूमिका घेतली होती का, असा प्रश्न उपस्थित करण्यास वाव राहत आहे.
------------------
गावनिहाय अतिक्रमणे
हरळी खुर्द (१), खमलेट्टी (१), माद्याळ कसबा नूल (१), हनिमनाळ (२), हिडदुगी (२), हसुरसासगिरी (३), कुमरी (५), इदरगुच्ची (६), उंबरवाडी (७), हडलगे (८), नेसरी (११), अरळगुंडी (१२), हुनगिनहाळ (१२), तेरणी (१४), नरेवाडी (१५), शिप्पूर तर्फ आजरा (१५), भडगाव (२२), कानडेवाडी (२२), सरोळी (२५), वडरगे (२५), बसर्गे बुद्रूक (२६), करंबळी (२६), बड्याचीवाडी (४४), शेंद्री (४६), मुगळी (४९), सांबरे (५३), हेब्बाळ कसबा नूल (६५), गिजवणे (६९), ऐनापूर (७९), कडगाव (७९), अत्याळ (९२), नूल (१००), खणदाळ (१२२), इंचनाळ (१३३), दुंडगे (१४८), औरनाळ (१९२), जरळी (२२७).

* अतिक्रमणांची वर्गवारी (ग्राफ करणे)
- निवासी........१२०१
- कृषी ......... ८१
- वाणिज्य....... ३५
- औद्यागिक..... १०
- अन्य......... ४३२