मनसे आंदोलन

मनसे आंदोलन

12903
कोल्हापूर : ई-चलनाद्वारे होणाऱ्या दंडात्मक कारवाईविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतर्फे पोलिस उपनिरीक्षक मनोज पाटील यांना निवेदन देण्यात आले.

ई-चलनाद्वारे होणाऱ्या
कारवाईविरोधात आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ : ई-चलनाद्वारे रिक्षा चालकांवर होणाऱ्या दंडात्मक कारवाईविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतर्फे आज आंदोलन करण्यात आले. दंडात्मक कारवाईबाबत शिथिलता आणावी, या मागणीचे निवेदन पोलिस उपनिरीक्षक मनोज पाटील यांना देण्यात आले.
ई चलनाद्वारे होणाऱ्या कारवाईमुळे सामान्य जनतेला मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेक वेळा पालक पाल्यांना शाळेत सोडण्यासाठी दुचाकी व चारचाकीतून जातात. त्यांनी परिसरात उभी केलेली वाहने वाहने तत्काळ वाहतूक विभागाच्या फिरत्या पथकाद्वारे नेली जातात. नो पार्किंगमध्ये वाहन उभे असेल तर किमान पाच वेळा तरी ध्वनीक्षेपकावरून सूचना करणे आवश्‍यक आहे. अनेक वेळा सिग्नलच्या ठिकाणी वाहतूक नियंत्रण करणारे कर्मचारी गैरहजर असतात. मोक्याच्या ठिकाणी मात्र ते शिकार साधण्याच्या इराद्याने उभे असतात, असा आरोप करत कार्यकर्त्यांनी रिक्षा फेरीद्वारे आंदोलन केले. सर्व रिक्षाचालक छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जैन बोर्डिंगशेजारील शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयासमोर गेले. तेथे त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनात राजू जाधव, आरिफ शेख, राज मकानदार, भीमराव साखरे, महेश साखरे, अतुल भालकर, राहूल भाट, किरण पोतदार, अजित चौगुले, मनीष क्षीरसागर, प्रवीण माने सहभागी झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com