पोलिस अधीक्षक पंडीत सकाळ भेट

पोलिस अधीक्षक पंडीत सकाळ भेट

06410

सर्वघटकांना विश्‍वासात घेवून काम करू
नुतन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित; ‘सकाळ’मध्ये साधला मुक्त संवाद

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ ः सर्व घटकांना विश्‍वासात घेवून काम करणार आहे. प्रश्‍नांची उकल तत्काळ आणि दिर्घकालीन आशा दोन्ही पद्धतीने करण्याचा प्रयत्न असेल, असे मत नुतन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी व्यक्त केले. दैनिक सकाळ कार्यालयाला भेट देवून त्यांनी आज कोल्हापूरचे प्रश्‍न आणि त्यांची उकल कशा पद्धतीने करता येईल, याबाबत संवाद साधला. सकाळ माध्यम समुहाचे संपादक-संचालक श्रीराम पवार आणि कार्यकारी संपादक निखिल पंडितराव यांच्याकडून वस्तूस्थिती जाणून घेतली. यावेळी पोलिस निरीक्षक तानाजी सावंत उपस्थित होते.
पंडित म्हणाले, ‘जिल्ह्यातील पोलिस दलाचा मी सिंबॉलीक प्रमुख आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यातील तीन हजार पोलिसांवर कायदा व सुव्यवस्था अवलंबून आहे. त्यामुळे पोलिस दलातील प्रत्येकाचा अनुभव आणि त्यांच्या कामाची पद्धत जाणून घेणार आहे. बदल्यातून त्यांचा प्रश्‍न मी तातडीने निकाली काढला आहे. पोलिसांनी सर्वसमान्यांच्या समस्या जाणून घेवून आवश्‍यक त्या ठिकाणी दखलपात्र आणि अदखलपात्र गुन्हे दाखल झाले पाहिजेत, या मताचा मी आहे. गुन्ह्यांची संख्या वाढली तरी चालेल. पण सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे. प्रथम जिल्ह्याचा आणि नंतर शहरातीस आढावा घेणार आहे.
आजच गांधीनगर पोलिस ठाण्याला भेट देवून प्रत्यक्ष कामाला सुरवात केली आहे. जिल्ह्यातील सर्व माहिती घेण्याचे काम सुरू आहे. सायबर गुन्हे, आर्थिक फसवणूक, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक, मोकांतर्गत कारवाई केलेले गुन्हेगार, कायदा व सुव्यस्थेचा प्रश्‍न यावर त्यांनी सविस्तर मत व्यक्त केले.

चौकट
‘पोलिसांचे समुपदेशन करणार’
लाच लुचपतमध्ये पोलिस आघाडीवर असल्याचे सांगितल्यावर जिल्ह्यातील सर्व पोलिसांचे समुपदेशन करणार असून, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठीही प्रयत्नशील असणार आहे. समस्या कमी झाल्या की त्यांच्याकडून अपेक्षीत काम होईल, असा विश्‍वास आहे. यापूर्वी नंदूरबार, गडचिरोली, मुंबई येथील कामाचा अनुभव पाठीशी आहे. तेथे ज्या समस्या आहेत, त्या कोल्हापुरातही आहेत. तेथे सर्व पोलिसांना, इतर घटकांना विश्‍वासात घेवून त्यांचे निरसन करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचेही पंडित यांनी स्पष्ट केले.

चौकट
‘शहरातील समस्यांबाबत महापालिकेला विश्‍वासात घेऊ’
स्पेनमध्ये नोकरी करतानाच्या काही आठवणींना उजाळा देवून अधीक्षक पंडित यांनी सांगितले, की शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रत्येकाचे मत विचारात घेणार आहे. स्वतः फिरून समस्यांची माहिती घेणार आहे. अद्यापही पोलिस निरीक्षकांची कायमस्वरुपी नियुक्ती नाही. हे शिवधनुष्य कोण सांभाळेल याची मी चाचपणी करीत आहे. शहरातील समस्यांबाबत महापालिकेला विश्‍वासात घेतले जाईल, असेही अधीक्षक पंडित यांनी सांगितले.
------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com