विद्यापीठाकडून पेपर फुटीची चौकशी सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यापीठाकडून पेपर फुटीची चौकशी सुरू
विद्यापीठाकडून पेपर फुटीची चौकशी सुरू

विद्यापीठाकडून पेपर फुटीची चौकशी सुरू

sakal_logo
By

विद्यापीठाकडून ‘पेपरफुटी’ची चौकशी सुरू
अहवाल, सीसीटीव्ही फुटेज मागविले; परीक्षा प्रमाद समिती करणार चौकशी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ०१ ः शिवाजी विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील पदवी परीक्षेत बुधवारी बी. कॉम. अभ्यासक्रमातील ॲडव्हान्स अकाउंटन्सी पेपर क्रमांक चार फुटल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या निदर्शनास आले. या प्रकरणाची विद्यापीठाकडून चौकशीची प्रक्रिया गुरुवारपासून सुरू झाली. याअंतर्गत परीक्षा मंडळाने संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडून अहवाल आणि एसआरपीडी कक्षातील सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली आहे. या पेपर फुटीच्या प्रकरणाची चौकशी परीक्षा प्रमाद समिती करणार आहे.
ॲडव्हान्स अकाउंटन्सी विषयाचा पेपर फुटल्याचे लक्षात आल्यानंतर परीक्षा मंडळाने तातडीने प्रश्‍नपत्रिका बदलून परीक्षा घेतली. या पेपरफुटी झाल्याचा संशय ज्या महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर आहे, तेथील सीसीटीव्ही फुटेज आणि त्याबाबतचा अहवाल लवकर सादर करण्याची सूचना संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना केली आहे. त्यांच्याकडून अहवाल आणि फुटेज प्राप्त झाल्यानंतर ते पाहून त्यावरील परीक्षा मंडळाची निरीक्षणे नोंदवून अहवाल परीक्षा प्रमाद समितीकडे पाठविण्यात येईल. त्याबाबतची कार्यवाही दोन दिवसांत पूर्ण केली जाईल. त्यानंतर परीक्षा प्रमाद समितीकडून सविस्तरपणे चौकशी करण्यात येईल, असे परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी सांगितले.

चौकट
‘कॉपी’ करणाऱ्या १० विद्यार्थ्यांना पकडले
बी. एस्सी., कॉम्प्युटर सायन्स, एज्युकेशन, फूड टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, अशा विविध २१ पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा गुरुवारी झाल्या. त्यासाठी १२,३०४ विद्यार्थी उपस्थित होते. या परीक्षेच्या कालावधीत भरारी पथकाने १० विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील सात आणि सातारा जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.