लग्न न झाल्याने घेतला गळफास

लग्न न झाल्याने घेतला गळफास

लग्न होत नसल्याच्या नैराश्यातून
तरुणाची शिंगणापुरात आत्महत्या
कोल्हापूर, ता. १ ः लग्न होत नसल्याच्या नैराश्यातून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. शिंगणापूर (ता. करवीर) आज सायंकाळी सहाच्या सुमारास येथे जनावरांच्या गोठ्यात ही घटना घडली. चेतन भिवाजी चौगले (वय ३३, रा. शिंगणापूर) असे मृताचे नाव आहे. वय झाले तरीही लग्न न झाल्यामुळे आत्महत्या केल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्न ठरवण्यासाठी गेल्या चार-पाच वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. मात्र, ते न जुळल्यामुळेच चेतन काही दिवसांपासून दु:खी होता. यातूनच त्याने आज सायंकाळी चौगुले मळा येथील जनावरांच्या शेडमध्ये लाकडी वाशाला दोरीने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. त्याचे शिक्षण दहावीपर्यंत झाले होते. तो वडिलांसह शेतीत रमला होता. जनावरांच्या दूध व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळत असतानाही लग्न न झाल्याने तो निराश होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com