
‘एम्पा’तर्फे इव्हेंट मॅनेजर डे उत्साहात
06432
कोल्हापूर ः इव्हेंट मॅनेजमेंट प्लॅनर्स असोसिएशनतर्फे इव्हेंट मॅनेजर डे उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी कार्यक्रमात पश्चिम महाराष्ट्रातील ८० इव्हेंट मॅनेजर सहभागी झाले.
इव्हेंट मॅनेजर डे
‘एम्पा’तर्फे उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ०१ ः इव्हेंट मॕनेजमेंट प्लॅनर्स असोसिएशनतर्फे (एम्पा) हॉटेल सयाजी येथे बुधवारी इव्हेंट मॅनेजर डे उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे ८० इव्हेंट मॅनेजर सहभागी झाले.
या कार्यक्रमाची सुरुवात सर्वांची ओळख करून देण्यापासून झाली. एम्पाच्या चार वर्षांच्या प्रवासाचा एक व्हिडिओ दाखवण्यात आला. कोल्हापुरातील मीडिया हाऊसमधील प्रमुख इव्हेंट मॅनेजर यांनी मार्गदर्शन केले. त्यात पत्रकार चारुदत्त जोशी, ‘सकाळ’च्या इव्हेंट विभागाचे सहाय्यक व्यवस्थापक सूरज जमादार यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी इव्हेंट इंडस्ट्री संदर्भात आपली मते मांडली. त्यानंतर केक कापून एकमेकांना शुभेच्छा देत इव्हेंट मॅनेजर डे साजरा करण्यात आला. संगीत मैफल झाली. त्यामध्ये कोल्हापूरचा बँड कपिल अँड फ्रेंड्स, बेळगाव येथील साश बँड यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले. गौरी यादव- शिरोडकर यांनी सूत्रसंचालन केले. ‘एम्पा’चे अध्यक्ष शाम बासरानी यांनी आभार मानले. या वेळी ‘एम्पा’चे संचालक तुषार पाटील, अवधूत भोसले, पवन बेकिनकर, राहुल जोशी, ज्योती जाधव, दीपक ओसवाल, संतोष शेट्टी, शम्मी खान, आदी उपस्थित होते.