
कोल्हापूर सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी मोहन गोखले
06412
मोहन गोखले, अनिल भालेकर, चंद्रकांत कांडेकरी, एम. बी. कुंभार
‘सिव्हिल इंजिनिअर्स’च्या
अध्यक्षपदी मोहन गोखले
उपाध्यक्षपदी अनिल भालेकर; एम. जी. कुंभार खजानीस
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : येथील कोल्हापूर सिव्हिल इंजिनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या सन २०२३-२०२४ या कालावधीसाठी पदाधिकाऱ्यांची निवड झाली. यात अध्यक्षपदी मोहन गोखले, उपाध्यक्षपदी अनिल भालेकर, खजानिसपदी एम. जी. कुंभार, तर सचिवपदी चंद्रकांत कांडेकरी यांची निवड झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी असोसिएशनचे मावळते अध्यक्ष संजय मांगलेकर होते. या वेळी ज्येष्ठ संचालक सुनील पोवार, उपाध्यक्ष राजेंद्र लाड, संतोष मंडलिक, जितेंद्र लोहार, विजय पाटील, सुजित भोसले आदी उपस्थित होते. दरम्यान, कोल्हापूर सिव्हिल इंजिनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ही महानगरपालिका नगररचना, प्राधिकरणाकडे नोंदणीकृत आहे. गेल्या १५ वर्षांपासून संस्था कार्यान्वित असून महानगरपालिका, प्राधिकरण, नगररचना विभागात सभासदांना येणाऱ्या अडचणी सोडविण्याचे काम करत आहे. समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्थांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित केली जातात, अशी माहिती गोखले यांनी दिली.