
लायन्स क्लब अध्यक्ष निवड बातमी
M06433
कोल्हापूर ः लायन्स क्लबच्या खजानीसपदी निवड झाल्याबद्दल संजय कुंभार यांचा सत्कार दिपक शहा यांनी केला. सोबत सुर्यकांत लोले व डॉ. अश्विनी कोळस्कर.
‘लायन्स क्लब’ची कार्यकारिणी जाहीर
कोल्हापूर ः लायन्स क्लब ऑफ कोल्हापूरच्या शहराध्यक्षपदी डॉ. अश्विनी कोळस्कर यांची निवड करण्यात आली. सचिवपदी सुर्यकांत लोले यांची नियुक्ती झाली. खजनिसपदी संजय कुंभार यांची निवड करण्यात आली. प्रथम उपाध्यक्ष म्हणून दीपक शहा, द्वितीय उपाध्यक्ष म्हणून मोहनलाल चांडक यांची निवड करण्यात आली. सहसचिव म्हणून डॉ. भानूदास कोळस्कर आणि सहखजानिस म्हणून महेश नेताणी यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. लायन्स क्लबच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीच्या घोषणा करण्यात आल्या. २०२३-२४ साठी ही कार्यकारणी निवडण्यात आली. नवी कार्यकारणी निवडण्याचे काम नरेंद्र पाध्ये यांनी पाहिले. निवड समिती सदस्य म्हणून मोहनलाल चांडक, नलिनी पारेख यांनी काम केले.