सांस्कृतिक पट्टा

सांस्कृतिक पट्टा

06462
विशाल राजस यांनी साकारलेली कलाकृती.

राजस यांच्या शिल्पाकृतींचे उद्यापासून प्रदर्शन
कोल्हापूर : विशाल राजस यांच्या शिल्पाकृतींचे प्रदर्शन राजर्षी शाहू स्मारक भवन कलादालनात रविवार (ता. ४) पासून आयोजित केले जाणार आहे. शनिवार (ता. १०) पर्यंत सकाळी दहा ते रात्री नऊ या वेळेत ते खुले राहणार असून या प्रदर्शनात फायबर माध्यमातील २४ कलाकृतींचा समावेश आहे. यामध्ये प्राण्यांचा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिल्पांचा समावेश आहे. या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन विशाल राजस यांनी केले आहे.
-------
06466
कोल्हापूर : मैफिलीत गीत सादर करताना भाग्येश मराठे.

घराणेदार गायनाची
आनंददायी मैफिल
कोल्हापूर : आकारयुक्त आवाजाचा सुरेल लगाव, राग स्वरूपाची पद्धतशीर बढत, समेवर येण्याचा डौल, चपळ तानक्रिया यांचा मिलाफ घडवत भाग्येश मराठे यांनी घराणेदार गायकीचे आनंददायी दर्शन घडविले. निमित्त होते गेल्या पिढीतील जयपूर घराण्याचे कलाकार व गुरू आनंदराव लिमये यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गायन समाज देवल क्लबतर्फे आयोजित केलेल्या विशेष सायंकालीन संगीत सभेचे.
भाग्येश यांनी मैफिलीची सुरूवात जयपूर घराण्याची खासियत मानल्या गेलेल्या राग ‘नंद’मधील ‘धुंडु बारे सैया’ या विलंबित त्रितालातील ‘आजहून आये’ ही रचना सादर केल्यानंतर ‘हिंडोल बहार’ या जोडरागातील बंदिश सादर करून संगीतप्रेमी रसिकांची दाद मिळवली. त्यानंतर ‘नट बिहाग’मधील बंदिश, टप्पा अंगाची काफी रागातील रचना ‘हरी मेरो जीवन प्राण आधार’ हे नाट्यगीत व रंग दे रंग दे ही भैरवी सादर करून दोन तासांहून अधिक काळ रंगलेल्या स्वर मैफिलीची सांगता केली. प्रणव गुरव व स्वरूप दिवाण यांनी तबला व हार्मोनियमची साथ दिली. देवल क्लबचे श्रीकांत डिग्रजकर यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ शास्त्रीय संगीत कलाकार पंडित अरुण कुलकर्णी, दिलीप गुणे यांनी स्वागत केले. यावेळी वासंती टेंबे, सुखदा काणे, सुबोध गद्रे, स्नेहा राजुरीकर, पंडित सुधीर पोटे, विनोद डिग्रजकर, वंदना आठल्ये उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com