खालसा गुडवळेतील डीपी धोकादायक

खालसा गुडवळेतील डीपी धोकादायक

खालसा गुडवळेतील डीपी धोकादायक
चंदगड ः खालसा गुडवळे (ता. चंदगड) येथील गट क्रमांक १८८ मधील वीज वितरण कंपनीचा डीपी धोकादायक स्थितीत आहे. तेथे विजेच्या तारा लोंबकळत असून सतत स्पार्किंग होत असते. येथे मुले खेळतात. गुरे चरण्यासाठी सोडली जातात. त्यांच्या जीविताला धोका आहे. वीज वितरण कंपनीने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी संभाजी बोर्डे, रामजी कांबळे यांनी केली आहे. कंपनीच्या येथील अभियंत्यांना याबाबत निवेदन दिले आहे.
--------------------------------------
धनंजय विद्यालयाचा शंभर टक्के निकाल
चंदगड ः नागनवाडी (ता. चंदगड) येथील धनंजय विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा निकाल शंभर टक्के लागला. कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांतील परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेत समृध्दी निलवे ८३.६७ टक्के, मनीषा करंबळकर ७३.८३ टक्के, दीपाली नाईक यांनी ७२.६७ टक्के गुण मिळवून पहिले तीन क्रमांक पटकावले. वाणिज्य शाखेत श्रुती सरनोबत ९२.१७ टक्के, ओमकार पाटील ८८.१७ टक्के, मधुश्री रेळेकर यांनी ८६.५० टक्के, तर विज्ञान शाखेत मधुरा पाटील ७४ टक्के, अश्विनी बोकडे ७१.८३ टक्के, शिवानी यमेटकर यांनी ६७.६७ टक्के घेऊन क्रमांक पटकावले. प्राचार्य सुरेश हरेर यांच्यासह विषय शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे सचिव जे. बी. पाटील यांनी अभिनंदन केले.

------------------------------------------
चंदगड दड्डी बस पूर्ववत सुरू करा
चंदगड ः तालुक्याच्या पूर्व भागाला जोडणारी कामेवाडीमार्गे चंदगड दड्डी बस पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी प्रा. बसवंत पाटील यांनी केली आहे. कर्नाटक सीमेलगतच्या चिंचणे, कामेवाडी, नरगट्टे, यर्तेनहट्टीतील नागरिकांना चंदगड, गडहिंग्लज, कोल्हापूर, बेळगाव परिसरांत संपर्क साधण्यासाठी ही गाडी सोयीची आहे. ती अनेक वर्षांपासून सुरू होती. कोरोनात ती बंद झाली. त्यानंतर चंदगड एसटी आगाराने अद्याप ती सुरू करण्याबाबत नियोजन केलेले नाही. त्यामुळे वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, विद्यार्थी यांची गैरसोय होत आहे. आगारप्रमुखांनी याची गांभीर्याने नोंद घेऊन ही गाडी सुरू करावी, अशी मागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com