मराठा तितुका मेळवावा पत्रकार परिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मराठा तितुका मेळवावा पत्रकार परिषद
मराठा तितुका मेळवावा पत्रकार परिषद

मराठा तितुका मेळवावा पत्रकार परिषद

sakal_logo
By

मराठा तितुका मेळवावा प्रतिष्ठानतर्फे
विशाळगडावर शिवराज्याभिषेक दिन


कोल्हापूर : मराठा तितुका मेळवावा प्रतिष्ठानतर्फे विशाळगडावर पाच व सहा जूनला शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जाणार आहे, अशी माहिती अध्यक्ष रणजित घरपणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्वराज्यातील शूरवीरांचे वंशज कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. श्री. घरपणकर म्हणाले, ‘ सोमवारी (ता. ५) दुपारी बारा वाजता पावनखिंडीचे पूजन केले जाणार आहे. शिवशाहीर संदीप चौगुले दुपारी दोन वाजता शाहिरी सादर करतील. मुंडा दरवाजा येथे सायंकाळी पाच वाजता ध्वजवंदन होणार आहे. सात वाजता शाहिरीचा कार्यक्रम व राजवाडा, भगवतेश्‍वर मंदिर येथे आतषबाजी केली जाईल. सहा जूनला राजवाडा परिसरात सकाळी सहा वाजता शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके, तर आठ वाजता पालखी पूजन केले जाणार आहे. नऊ वाजता गंगानदीच्या जलाने व दुग्धाभिषेकाने उत्सवमूर्तीची पूजा केली जाईल. दहा वाजून दहा मिनिटांनी नाण्यांचा अभिषेक घालण्यात येईल. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे.’’