दुध उत्पादकांच्या हिताचा कारभार करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुध उत्पादकांच्या हिताचा कारभार करणार
दुध उत्पादकांच्या हिताचा कारभार करणार

दुध उत्पादकांच्या हिताचा कारभार करणार

sakal_logo
By

ajr22.jpg
06570
आजरा ः येथील व्यंकटराव हायस्कूलमध्ये गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांचा सत्कार करतांना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी. या वेळी आजरा महाल शिक्षण संस्थेचे संचालक.
-----------------
दुध उत्पादकांच्या हिताचा कारभार करणार
अरूण डोंगळे ः आजरा येथे विविध संस्थामार्फत सत्कार
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ५ ः तीस वर्षांहून अधिक काळ गोकुळ दुध संघात कार्यरत आहे. त्यामुळे सर्व दुध उत्पादकांच्या समस्यांची चांगली जाणीव आहे. गोकुळ दुध संघाचे दुसऱ्‍यांदा अध्यक्षपद मिळाले आहे. या कारकिर्दीत सर्वसामान्य दुध उत्पादकांच्या हिताचा कारभार करणार असल्याचे प्रतिपादन गोकुळ दुध संघाचे नुतन अध्यक्ष अरूण डोंगळे यांनी केले.
श्री. डोंगळे यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आजरा तालुक्यातील विविध संस्थांच्यावतीने सत्कार केला. या कार्यक्रमात श्री. डोंगळे यांनी मार्गदर्शन केले. श्री. डोंगळे यांचा आजरा तालुका खरेदी-विक्री संघ, अण्णा-भाऊ संस्था समूह, आजरा महाल शिक्षण मंडळ, जनता बँक, सरपंच परिषद यांच्यासह तालुक्यातील मान्यवरांनी सत्कार केला. श्री. डोंगळे म्हणाले, ‘दुध उत्पादकांना आपला अध्यक्ष झाल्याची भावना निर्माण झाली आहे. आजरा तालुक्यातील दुधाची प्रत चांगली आहे. त्यामुळे आगामी काळात दुध वाढीसाठी प्रयत्नशील राहणार आहे. त्याचबरोबर दुग्ध व्यवसायात युवकांचा सहभाग वाढणे गरजेचे आहे.’ जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई, अण्णा-भाऊ संस्था समूह प्रमुख अशोक चराटी, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, माजी सभापती विष्णूपंत केसरकर, उदयराज पोवार, राजू होलम, रविंद्र भाटले, नगरसेवक अभिषेक शिंपी, विक्रमसिंह देसाई यांच्यासह तालुक्यातील दुध संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.