जनता विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जनता विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
जनता विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

जनता विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

sakal_logo
By

06611
तुर्केवाडी ः स्नेहमेळाव्याप्रसंगी १९९५-९६ बॅचचे विद्यार्थी व आजी-माजी शिक्षक.
---------------------
जनता विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
चंदगड, ता. ५ ः तुर्केवाडीतील (ता. चंदगड) जनता विद्यालयात १९९५-९६ मधील दहावीचे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा झाला. त्यांनी २७ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला.
स्नेहमेळाव्यात माजी विद्यार्थी-शिक्षकांबरोबर आजी विद्यार्थी आणि शिक्षकही सहभागी झाले होते. निवृत्त मुख्याध्यापक एस. एम. पाटील अध्यक्षस्थानी होते. समारंभाला उपस्थित असलेल्या मान्यवरांचा माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते सत्कार केला. त्यानंतर शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. माजी विद्यार्थ्यांपैकी विनोद सुतार, डॉ. सुरेखा गावडे, लक्ष्मण पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. गणपती साळुंखे यांनी संत तुकारामांचा अभंग सादर केला. निवृत्त शिक्षक व्ही. आर. गावडे, एस. आर. मुरकुटे, व्ही. के. मानकर, वाय. एस. जोशी, आर. एन. पाटील, बी. डी. जाधव, मुख्याध्यापक पी. एन. येळ्ळूरकर, एम. के. गावडे, एम. डी. मसुरकर, एन. टी. गावडे, के. के. कांबळे, बापू जाधव आदी उपस्थित होते. माजी विद्यार्थी व शिक्षक जे. एल. तोराळकर यांनी प्रास्ताविक केले. दहावीच्या विद्यार्थिनींनी गायिलेल्या स्वागतगीत व ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. माया चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. भरमाण्णा कांबळे यांनी आभार मानले. स्नेहभोजनाने स्नेहमेळाव्याचा समारोप झाला.