आजरा साखर कारखान्यात मिल रोलरचे पुजन

आजरा साखर कारखान्यात मिल रोलरचे पुजन

ajr24.jpg....
06615
गवसे (ता. आजरा)ः येथील साखर कारखाना मिल रोलर पुजन प्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनिल शिंत्रे, उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी आदी उपस्थित होते.

आजरा साखर कारखान्यात मिल रोलरचे पुजन
आजरा, ता. ४ ः गवसे (ता. आजरा) येथील आजरा शेतकरी साखर कारखान्यात येत्या गळीत हंगामाची तयारी म्हणून ओव्हर होलींगचे काम सुरु आहे. कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनिल शिंत्रे यांच्याहस्ते मिल रोलरचे पुजन केले. अध्यक्ष प्रा. शिंत्रे म्हणाले, ‘येत्या गळीत हंगामाची तयारी म्हणून ओव्हर होलींगचे काम सुरु आहे. कारखान्याने २०२३-२४ च्या गळीत हंगामासाठी ८ हजार ५०० हेक्टर क्षेत्राची नोंद केली केली आहे. येत्या गळीत हंगामात साडेचार लाख हेक्टर गाळपाचे उद्दीष्ट आहे. ३० सप्टेंबर २०२३ पूर्वी कारखान्याच्या ओव्हर होलींगचे काम पुर्ण केले जाईल. कारखाना गळीतासाठी सज्ज ठेवणार आहे. येत्या गळीत हंगामासाठी ३७५ टोळ्यांचे नियोजन केले आहे. त्यांना अॅडव्हान्स वाटप लवकरच सुरु केले जाईल. आवश्यक कामकाजासाठी यंत्रणा सज्ज करण्याचे नियोजन केले जात आहे.’
उपाध्यक्ष आनंदा कुलकर्णी, संचालक विष्णुपंत केसरकर, श्रीमती अंजनाताई रेडेकर, मुकुंदराव देसाई, एम. के. देसाई, दिगंबर देसाई, दशरथ अमृते, जनार्दन टोपले, मलिककुमार बुरुड, राजेंद्र सावंत, अनिल फडके, आनंदा कांबळे, तानाजी देसाई, कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. टी. ए. भोसले, जनरल मॅनेजनर (टेक्निकल) व्ही. के. गुजर, सचिव व्यंकटेश ज्योती, सिव्हील इंजिनिअर शंकर आजगेकर, कामगार अधिकारी सुभाष भादणकर, कामगार युनियन अध्यक्ष प्रकाश देसाई आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com