शिवराज्याभिषेक दिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवराज्याभिषेक दिन उत्साहात
शिवराज्याभिषेक दिन उत्साहात

शिवराज्याभिषेक दिन उत्साहात

sakal_logo
By

ich25.jpg
06616
इचलकरंजी : शिवतीर्थावर आकर्षक सजावट करण्यात आली होती.
----------
शिवराज्याभिषेक दिन उत्साहात
इचलकरंजी : येथील हिंदुत्ववादी संघटनांतर्फे तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा केला. सात ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शिवरायांचे गोडवे गाणारे गीत सादर करत व्याख्यान झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे अनेक विविध ठिकाणी शिवसाम्राज्य दिन याविषयी नागरिकांना माहिती दिली. शिवतीर्थावर विद्युत रोषणाईसह आकर्षक सजावट केली होती. सकाळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेतर्फे शिवतीर्थावर अश्‍वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मंत्रोच्चारात दुग्धाभिषेक घातला. जयघोष करत आकर्षक आतषबाजीही केली. शहरातील शिवतीर्थावर दिवसभर विविध मंडळांचे कार्यकर्ते व शिवप्रेमींची रेलचेल होती.