पाटाकडील तालीम अ अंतिम फेरीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाटाकडील तालीम अ अंतिम फेरीत
पाटाकडील तालीम अ अंतिम फेरीत

पाटाकडील तालीम अ अंतिम फेरीत

sakal_logo
By

लोगो - अटल चषक फुटबॉल स्पर्धा

06666
कोल्हापूर : तटाकडील तालीम मंडळ आयोजित अटल चषक फुटबॉल स्पर्धेत पाटाकडील तालीम विरुद्ध संयुक्त जुना बुधवार तालीम यांच्या सामन्यातील क्षण. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)


पाटाकडील तालीम ‘अ’ अंतिम फेरीत 
जुना बुधवारला नमविले; उद्या शिवाजी मंडळ विरुद्ध रंगणार सामना
कोल्हापूर, ता. २ : चुरशीच्या झालेल्या सामन्यात पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ संघाने संयुक्त जुना बुधवार पेठ संघावर टायब्रेकरमध्ये ४ विरुद्ध ३ गोल फरकाने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. अटल चषक फुटबॉल स्पर्धेतील सामना छत्रपती शाहू मैदानावर झाला. स्पर्धेचा अंतिम सामना श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ यांच्यामध्ये रविवारी दुपारी ४ वाजता होणार आहे. जुना बुधवार संघाने दिलेल्या कडव्या झुंजीमुळे अखेरपर्यंत गोल शून्य बरोबरीत राहिलेल्या सामन्यात पाटाकडील संघाने टायब्रेकरमध्ये विजय मिळवला.
सुरुवातीपासून आक्रमक खेळणाऱ्या पीटीएम ‘अ’ संघावर जुना बुधवार संघाने अंकुश राखले. पीटीएम ‘अ’ च्या अनेक चढाया फोल ठरवत सामन्यात दबदबा कायम ठेवला. पूर्वार्ध गोल शून्य बरोबरीत राहिला. उत्तरार्धात जुना बुधवार संघाने आक्रमक चाली रचल्या. दरम्यान, पीटीएम ‘अ’च्या गोल जाळीवर केलेले आक्रमण फोल ठरले. सामन्यात काही वेळ शिल्लक असताना दोन्ही सांगा अधिक आक्रमक खेळू लागल्याने खेळाडूंमध्ये किरकोळ वादाचे प्रसंग घडले. मात्र पंचानी मध्यस्थी करत खेळाडूंना समज दिली. सामना पूर्णवेळ गोल शून्य बरोबरीत राहिला. 
---------------
असा झाला टाय ब्रेकर 
पीटीएम अ* जुना बुधवार 
प्रतीक बदामे - गोल*रिचमंड अवेटी - गोल 
यश देवणे - अडवला*नीलेश सावेकर - गोल
ओंकार जाधव - गोल*सुशीलकुमार पाटील - अडवला
रोहित पोवार - गोल*आकाश मोरे - अडवला
अक्षय पायमल - गोल*इमॅनुअल - गोल
-------------
चौकट
अर्वाच्च शिवीगाळ; अश्‍लील हावभाव
सामन्यांमध्ये खेळाडूंमधील ईर्ष्येचे पडसाद मैदानातील प्रेक्षकातून उमटले. खेळाडूंच्या दिशेने पाण्याच्या बाटल्या भिरकावण्यात आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना प्रेक्षकांकडून अर्वाच्च शिवीगाळ व अश्‍लील हावभाव करण्यात येत होते.
-------------
चौकट 
इमॅनुअलला रेड कार्ड
जुना बुधवार पेठ संघाचा खेळाडू इमॅनुअल याला मैदानावरील गैरवर्तनाबद्दल डब्बल यल्लो असे रेड कार्ड देण्यात आले. 
----------
सामनावीर 
शबीर गणी : पीटीएम अ 
-----------
लढवय्या 
सुशील सावंत - जुना बुधवार