Sat, Sept 23, 2023

चित्रकला स्पर्धा
चित्रकला स्पर्धा
Published on : 3 June 2023, 1:51 am
‘महिला व बालकल्याण’तर्फे चित्रकला स्पर्धा
कोल्हापूर, ता. ३ : महानगरपालिका महिला व बालकल्याण समिती आणि शिवाजी विद्यापीठ यांच्यातर्फे जिल्हा परीविक्षा अनुरक्षण संघटनेच्या बालकल्याण संकुलात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या वेळी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, उपायुक्त शिल्पा दरेकर, यशपालसिंग रजपूत, अधीक्षक प्रीती घाटोळे, पर्यावरणशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. आसावरी जाधव, बालकल्याण संकुलचे उपाध्यक्ष व्ही. बी. पाटील, मानद सचिव पदमजा तिवले, अधीक्षक पी. के. डवरी, द्रौपदी पाटील, नजीरा नदाफ, सचिन माने आदी उपस्थित होते.
पहिली ते चौथी, पाचवी ते आठवी व नववी ते बारावी या वयोगटातील मुले व मुलींमध्ये घेण्यात आली. समितीमार्फत ५ जूनला या मुलांची शिवाजी विद्यापीठात सहल आयोजित केली आहे.