दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी गुरुवारी मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी गुरुवारी मार्गदर्शन
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी गुरुवारी मार्गदर्शन

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी गुरुवारी मार्गदर्शन

sakal_logo
By

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी गुरुवारी मार्गदर्शन
इचलकरंजीत शरद सायन्स कॉलेजकडून आयोजन; शिष्यवृत्तीसह उपलब्ध पर्यायांची माहिती

दानोळी, ता. ४ ः यड्राव येथील शरद सायन्स अॅण्ड कॉमर्स कॉलेजतर्फे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन मेळावा गुरुवारी (ता. ८) सकाळी साडेअकरा वाजता श्रीमंत घोरपडे नाट्यगृह, इचलकरंजी येथे आयोजित केला आहे. मेळाव्यात भारतीय सशस्त्र दलाचे कमिशन्ड अधिकारी मुदीत सुद विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
दहावी, बारावी परिक्षेनंतर महाविद्यालयीन शिक्षण व करिअरची नेमकी दिशा ठरवण्यासाठी मार्गदर्शन मेळाव्यात मिळणार आहे. विद्यार्थ्यांना राज्य व केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्ती, संस्थास्तरावरील शिष्यवृत्ती, ईडब्ल्यूएस व टीएफडब्ल्यूएस याचा उपयोग प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे सीट डिस्ट्रीब्युशन आणि श्रेणी (कॅटेगरी) आरक्षण याविषयाची माहिती मिळणार आहे.
दहावी-बारावीनंतरचे महाविद्यालयीन प्रवेश, उपलब्ध पर्यायांची माहिती, अभियांत्रिकी, आयटीआय, कृषी पदवी, डिफेन्स यासह विविध क्षेत्रातील मार्गदर्शन या मेळाव्यात मिळणार आहे. त्याचबरोबर विविध महाविद्यालय स्टॉलसह सहभागी होणार आहेत.