
परशराम हरेर अध्यक्षपदी
gad45.jpg :
06903
परशराम हरेर, रिक्सन रॉड्रीक्स
----------------------
परशराम हरेर अध्यक्षपदी
गडहिंग्लज : येथील साधना शिक्षण संस्था सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी परशराम हरेर यांची तर उपाध्यक्षपदी रिक्सन रॉड्रीक्स यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी आर. जे. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत या निवडी झाल्या. अध्यक्षपदासाठी श्री. हरेर यांचे नाव खलील मकानदार यांनी सूचवले. त्याला जे. ए. नोरोना यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी श्री. रॉड्रीक्स यांचे नाव सतीश कांबळे यांनी सूचवले. त्याला अफसाना यळकुद्रे यांनी अनुमोदन दिले. संचालक स्वाती कोरी, दत्तात्रय कुंभार, गणपती पाटोळे, रमण लोहार, शिवाजी कुराडे, फारुक मकानदार, सफिया पेंढारी आदी उपस्थित होते. सचिव उमेश दंडगे यांनी आभार मानले.
------------------------------
gad46.jpg
06904
करंबळी : अर्चना सुतार यांना होळकर पुरस्कार अनुप पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. बाळगोंडा पाटील, राजाराम इंगळे, रेश्मा पोवार उपस्थित होते.
अर्चना सुतार यांना होळकर पुरस्कार
गडहिंग्लज : करंबळी (ता. गडहिंग्लज) येथील आशा स्वयंसेविका अर्चना सुतार यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित केले. त्या करंबळी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राकडे कार्यरत आहेत. कोरोनात केलेल्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार दिला. सरपंच अनुप पाटील यांच्या हस्ते त्यांना गौरवले. उपसरपंच राजाराम इंगळे, पोलिस पाटील बाळगोंडा पाटील, ग्रामसेविका रेश्मा पोवार उपस्थित होते.