मुंबई फेरीने आगार मालामाल

मुंबई फेरीने आगार मालामाल

मुंबई फेरीने आगार मालामाल
गडहिंग्लजला दोन महिन्यात तीस लाखाचे उत्पन्न : गाडी कायम ठेवण्याची चाकरमान्यांची मागणी
दीपक कुपन्नावर : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ५ : पुर्वीपासून मुंबईत या परिसरातील चाकरमान्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे मुंबईसाठी ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या पार्श्वभूमीवर आगाराने परेल आणि बोरिवली या दोन गाडया रोज सोडल्या होत्या. त्यातून दोन महिन्यात सुमारे तीस लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. प्रवाशांची संख्या अधिक असल्याने हा मार्ग आगारासाठी उत्पन्नाचे हमखास स्त्रोत बनू शकतो. त्यासाठी सायंकाळी कायमस्वरुपी मुंबई बसफेरी ठेवावी, अशी चाकरमानी प्रवाशांची मागणी आहे.
या परिसरातील ग्रामस्थ नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने मोठ्या संख्यने मुंबईला आहेत. त्यामुळेच या आगारासह चंडगड, आजरा आगाराच्या गाड्या मुंबईला धावत होत्या. पुर्वी ग्रामीण भागातून सुटणाऱ्या काही मुंबई गाड्यांनी कारकिर्दीचा सुवर्णमहोत्सव साजरा केला आहे. पण, काही वर्षे उत्पन्न कमी म्हणून आगाराने या गाड्या बंद केल्या. केवळ एसटीच्या फेऱ्यात सातत्य नसल्यानेच प्रवाशी महागड्या असुरक्षित खासगी गाड्यांकडे वळले. गडहिंग्लजहून या मार्गावर प्रवाशांची संख्या अधिक असल्याने डझनाहून अधिक खासगी गाड्या रोज मुंबईला जातात.
मुंबईच्या परेल, बोरिवली या परिसरात बहुतांश लोक रहायला आहेत. पुर्वी केवळ गणपती, दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीलाच हे लोक गावी यायचे. पण, गेल्या दोन दशकात हे चित्र बदलून गेले आहे. सण, समारंभासह विविध कामांमुळे वर्षभर नातेवाईकांची मुंबईला ये-जा सुरु असते. त्यामुळेच खासगी गाड्यांची संख्या वाढली आहे. कोरोनानंतर पुन्हा प्रवाशी एसटीकडे वळला आहे. दोन महिन्यात परेल आणि बोरिवली गाडीतून तीस लाखाचे उत्पन्न मिळाल्याचे आगार व्यवस्थापक गुरुनाथ रणे यांनी सांगितले. मिळणारे उत्पन्न पाहता आगाराने संयम ठेवून ही फेरी कायम ठेवण्याची आवश्यकता आहे. त्यातूनच विश्वास वाढून प्रवाशांचा ओघ कायम राहिल.
----------------
हक्काचा प्रवाशी
साठ वर्षावरील प्रवाशांना पन्नास टक्के सवलत आहे. पंचाहत्तर वर्षावरील प्रवाशांना शंभर टक्के सवलत दिली आहे. महिलांना गेल्या महिन्यापासून पन्नास टक्के सवलत दिली आहे. त्यामुळे हे दोन्ही घटक केवळ एसटीनेच प्रवास करत आहेत. सुरक्षित प्रवास ही एसटीची जमेची बाजू आहे. त्यासाठी मुंबई मार्गावर कायमस्वरूपी फेरी सुरु ठेवावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com