इचल ः व्यापारी परिसंवाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल ः व्यापारी परिसंवाद
इचल ः व्यापारी परिसंवाद

इचल ः व्यापारी परिसंवाद

sakal_logo
By

06970

इचलकरंजी ः व्यापारी परिसंवाद मेळाव्यात केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी खासदार धनंजय महाडिक, अपराजिता सारंगी, आमदार प्रकाश आवाडे, सुरेश हाळवणकर, नितीन धूत आदी उपस्थित होते. (पद्माकर खुरपे ः सकाळ छायाचित्र सेवा)
...

‘वस्त्रोद्योगाशी संबंधित सर्व प्रश्न
मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहू’

इचलकरंजी, ता.४ ः ‘इचलकरंजी शहराने वस्त्रोद्योगात झपाट्याने प्रगती केली आहे. त्यामुळे या शहराचे नाव केवळ भारताच्याच नव्हे तर जगाच्या नकाशावर आले आहे. यामध्ये या क्षेत्रातील उद्योजक, व्यापारी यांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे या घटकांचे वस्त्रोद्योगाशी संबंधित सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रयत्नशील राहू’, अशी ग्वाही आज केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांनी दिली.
येथील श्रीमंत ना.बा. घोरपडे नाट्यगृहात विविध १४ संस्थांच्यावतीने व्यापारी परिसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी भुवनेश्वरच्या खासदार अपराजिता सारंगी, खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मंत्री शिंदे यांना विविध संस्थांच्यावतीने मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
खासदार सारंगी म्हणाल्या, ‘समाजातील सर्वच घटकांचा विकास झाला पाहिजे, यावर पंतप्रधान मोदी यांचा भर राहिलेला आहे. त्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहेत. त्यामुळे शेवटच्या घटकालाही या योजनांचा लाभ मिळतांना दिसत आहे. कोरोनानंतरही भारताची अर्थव्यवस्था द्रुतगतीने पुढे जात आहे.’
आमदार प्रकाश आवाडे यांचेही भाषण झाले. स्वागत भाजप शहराध्यक्ष अनिल डाळ्या यांनी केले. प्रास्ताविक कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष नितीन धूत यांनी केले. त्यांनी वस्त्रोद्योगासाठी आवश्यक विविध असलेल्या मागण्यांचा आढावा घेतला. इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आभार मानले. व्यासपीठावर हिंदूराव शेळके, राहुल आवाडे यांच्यासह संयोजक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. ओम पाटणी यांनी सुत्रसंचालन केले.
------------

काय करायचं ते बघा, पण एकमत करा !

‘काय करायचं ते बघा, पण एकमत करा !’, अशी भाजप अंतर्गत स्थानिक पातळीवर होत असलेल्या अडचणीबाबत उघड भूमिका आज आमदार आवाडे यांनी परिसंवाद मेळाव्यात मांडली. त्यांचा अद्याप भाजप प्रवेश झालेला नाही. तर माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्याशी त्यांचे अद्याप राजकीय सूर जुळलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर त्यांनी आज खुलेपणाने आपली भूमिका मांडली. आम्ही भाजपसोबत आहोत व पुढेही कायम राहणार आहे. पण आमचे स्थानिक पातळीवर जमवा, असे आवाहन भाजपच्या नेत्यांना त्यांनी यावेळी केले. ‘आमचे एकमत झाल्यास दोन्ही खासदारांसह बहुतांशी आमदार भाजपच्या चिन्हावर निवडून आणू’, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.