शिवराज्याभिषेकासाठी मानाचा ध्वज रायगडकडे

शिवराज्याभिषेकासाठी मानाचा ध्वज रायगडकडे

ich410.jpg
06989
इचलकरंजी ः येथील शिवतीर्थ येथून शिवराज्याभिषेकासाठी मानाचा ध्वज रायगडला रवाना करण्यात आला.
---

शिवराज्याभिषेकासाठी मानाचा ध्वज रायगडकडे
---
इचलकरंजीतील गिरीभ्रमण संघटनेला मान; शिवप्रेमी कार्यकर्ते रवाना
इचलकरंजी, ता. ४ ः किल्ले रायगड येथे ६ जूनला होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनी मानाचा ध्वज फडकावण्याचा मान हा इचलकरंजी गिरीभ्रमण संघटनेला दिलेला आहे. हा मानाचा ध्वज घेऊन येथून असंख्य शिवप्रेमी कार्यकर्ते छत्रपती शिवरायांचा जयघोष करीत आज रायगडाकडे रवाना झाले.
गेल्या १९ वर्षांपासून मानाच्या ध्वजाची परंपरा सुरू आहे. त्याचा मान इचलकरंजी येथील गिरीभ्रमण संघटनेला मिळालेला आहे. आज सकाळी शिवतीर्थ येथे आदित्य आवाडे, शिवतीर्थ समितीप्रमुख पुंडलिक जाधव व शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक विकास अडसूळ यांच्या हस्ते मानाच्या ध्वजाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ध्येयमंत्र, प्रेरणा गीतानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर शिवप्रेमी कार्यकर्ते रायगडकडे रवाना होणाऱ्‍या वाहनांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते केले. या वेळी प्रकाश मोरबाळे, सुनील कोठावळे, मधुकर गुरव, राजेंद्र ढपाले, संजय हजारे, सचिन कांबळे, धर्मदास मोटे, संदीप चव्हाण, दीपक गुरव, सचिन वरपे, सुरेश नवनाळे, अमीर शेख, किरण कोठावळे, अवधूत गुरव, विजय कोपार्डे आदी उपस्थित होते.
----
वर्षभर फडकणार भगवा ध्वज
रायगडावर फडकावण्यात येणारा हा मानाचा ध्वज तब्बल ८५ मीटर कापडापासून बनवला आहे. यंदाचे शिवराज्याभिषेक दिनाचे ३५० वे वर्ष असून, त्याचे औचित्य साधत संघटनेने ६ जून २०२३ ते ६ जून २०२४ या वर्षभराच्या कालावधीत सलग ३६५ दिवस रायगडावरील ध्वज फडकावत ठेवण्याचा संकल्प केला. त्या दृष्टीने आवश्यक ती सर्व तयारी संघटनेकडून केली आहे. त्यामुळे या वर्षभरात रायगडावर भगवा ध्वज डौलाने फडकत राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com