
इचल: 3 लाख 22 हजाराचा मुद्देमाल लंपास
फोटो
...
इचलकरंजीत दोन ठिकाणी चोरी,
३ लाखाच्या मुद्देमालावर डल्ला
इचलकरंजी, ता. ४ : शहरात शुक्रवारी दोन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या. यामध्ये चोरट्यांनी ३ लाख २२ हजाराचा मुद्देमाल लंपास केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील बडबडे हॉस्पिटल परिसरामध्ये राहणाऱ्या अनिल विठ्ठल कुलकर्णी यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने सुमारे १ लाख ८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. याबाबतची फिर्याद कुलकर्णी यांनी इचलकरंजी पोलिस ठाण्यात दिली आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ५ ते रात्री ९ च्या सुमारास घडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामध्ये ६७ हजार रुपये रोख रक्कम, ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण, एक हजार रुपये किमतीचे चांदीचे पैंजण यांचा समावेश आहे. याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भागवत मुळीक करत आहेत.
तर अष्टविनायक कॉलनी, साईप्रसाद रेसिडेन्सी येथील तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या डागा कुटुंबाच्या फ्लॅटमधून चोरट्याने सुमारे २ लाख १४ हजाराच्या मुद्देमालावर डल्ला मारला. याबाबतची फिर्याद डागा यांनी इचलकरंजी पोलिस ठाण्यात दिली आहे. या चोरीमध्ये १ लाख १२ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन, ९२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या, दोन मोबाइल फोन व किमती घड्याळ असा एकूण सुमारे २ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमालाचा समावेश आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक गाढवे करत आहेत.