सोनसाखळी चोरट्याला अटक

सोनसाखळी चोरट्याला अटक

07071
...
सराईत सोनसाखळी चोरटा गजाआड

सोन्याच्या दागिन्यांसह २ लाख ८१ हजाराचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर, ता. ४ ः महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसडा मारून चोरून नाणाऱ्या सराईत चोरट्याला शनिवारी (ता.३) पोलिसांनी जयसिंगपूर येथून अटक केली. अभिजीत अरुण सातपुते (वय ३३, रा.मंगळवार पेठ, चर्च रोड, मिरज, जि.सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून सोन्याचे ३० ग्रॅम वजनाचे दागिने, गुन्ह्यातील मोपेड, मोबाईल असा सुमारे २ लाख ८१ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अभिजीतवर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात जबरी चोरीचे १४ गुन्हे दाखल आहेत.
याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वटपोर्मिणेच्या निमित्ताने महिला सोन्याचे दागिने परिधान करून वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी जातात. यावेळी सोनसाखळी चोरीचे गुन्हे घडण्याची शक्यता अधिक असते. त्या दृष्टीने स्थानिक गुन्हे अन्वषेण विभागाचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी पथके बनवली होती. पोलिस अंमलदार महेश खोत यांना एक सराईत सोनसाखळी चोरटा जयसिंगपूर येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी एक पथक बनवले. त्यांनी शनिवारी (ता.३) दुपारी जयसिंगपूर येथील चौंडेश्वरी फाटा येथे अभिजीतला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सोन्याचे मिनी मंगळसूत्र, एक चेन, असा ३० ग्रॅम वजनाचा ऐवज मिळाला. तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि मोबाईलही ताब्यात घेतला. असा एकूण २ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त करण्यात आला. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने इचलकरंजी येथील येलाज मळा आणि श्रीपादनगर येथील जैन मंदिर जवळ वयोवृद्ध महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरल्याचे कबूल केले.
सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर वाघ, पोलिस अंमलदार प्रशांत कांबळे, महेश खोत, संजय इंगवले, अमर शिरढोण, सुरज चव्हाण, रणजित पाटील यांनी ही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com