पर्यटक गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यटक गर्दी
पर्यटक गर्दी

पर्यटक गर्दी

sakal_logo
By

07073 ( यातील दुसराच फोटो घेणे)

अंबाबाई मंदिरासह
पर्यटनस्थळांवर गर्दी

कोल्हापूर, ता. ४ : उन्हाळी सुटीच्या शेवटच्या टप्प्यात अंबाबाई दर्शनासह पर्यटनासाठी आलेल्या भाविक-पर्यटकांच्या मांदियाळीने जिल्हा बहरला. पर्यटन व्यवसायातून जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोट्यवधीची उलाढाल झाली. रविवारी गर्दीमुळे शहरातील बहुसंख्य रस्ते गजबजले, तर शहरातील बहुतांश उद्याने बलचमूंनी गजबजली. सायंकाळी उन्ह खाली झाल्यानंतर रंकाळा, महावीर उद्यान अशा बागांमध्ये स्थानिकांसह पर्यटकांनी मोठी गर्दी केली.
सलग शासकीय सुट्या, तसेच शाळा, महाविद्यालयांच्या सुटीमुळे मोठ्या संख्येने भाविक, पर्यटक आल्याने शहर गर्दीने बहरले. साडेतीन पीठांपैकी एक असणाऱ्या अंबाबाईच्या दर्शनासाठी पर्यटक, भाविक मोठ्या प्रमाणात कोल्हापुरात येत आहेत. उन्हाळी सुटी लागल्यापासून शहरात अंबाबाई दर्शनासाठी लाखो भाविक हजेरी लावत आहेत. सुटी संपत आल्याने रविवारी शहरात पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली. अंबाबाई दर्शनासाठी मंदिरासह परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. दर्शनरांग जुना राजवाडा पोलिस ठाणे, तसेच भवानी मंडपपर्यंत पोहचली. परिणामी, महाद्वार रोड, शिवाजी रोड, बिंदू चौक, राजारामपुरी, स्टेशन रोड आदींसह शहराच्या विविध भागांत रस्त्यांवर मोठी वर्दळ होती. पर्यटकांच्या वर्दळीमुळे महाद्वार रोडसह विविध भागांतील विविध दुकानांत खरेदीसाठी गर्दी झाली होती.