जिल्ह्यात १०८७७ जणांनी दिली ‘संयुक्त परीक्षा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात १०८७७ जणांनी दिली ‘संयुक्त परीक्षा’
जिल्ह्यात १०८७७ जणांनी दिली ‘संयुक्त परीक्षा’

जिल्ह्यात १०८७७ जणांनी दिली ‘संयुक्त परीक्षा’

sakal_logo
By

जिल्ह्यात ८४८६ जणांनी दिली
राज्यसेवा पूर्व परीक्षा

‘एमपीएससी’तर्फे ३४ केंद्रांवर आयोजन; २३४९ उमेदवार अनुपस्थित

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) रविवारी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा कोल्हापुरातील विविध ३४ केंद्रांवर घेण्यात आली. त्यासाठी नोंदणी केलेल्या एकूण १०८७७ उमेदवारांपैकी ८४८६ जणांनी परीक्षा दिली, तर २३९१ उमेदवार अनुपस्थित राहिले.
उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, बीडीओ, उपशिक्षणाधिकारी अशा विविध ३१ पदांच्या भरतीसाठी सकाळी १० ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ५ अशा दोन सत्रांमध्ये परीक्षा झाली. त्यातील पहिल्या सत्रात सामान्य ज्ञान विषयाचा पेपर झाला. त्यात २०० गुणांसाठी १०० प्रश्‍न होते. या पेपरसाठी ८५३६ उमेदवार उपस्थित, तर २३४१ जण अनुपस्थित राहिले. दुसरा पेपर ‘सी-सॅट’ विषयाचा होता. त्यात २०० गुणांसाठी ८० प्रश्‍न होते. या पेपरला ८४८६ उमेदवार उपस्थित होते. या परीक्षेसाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनातील १२०८ कर्मचारी कार्यरत होते. एक विशेष निरीक्षक, ९ समन्वय अधिकारी, तर दोन भरारी पथक तैनात होती. दरम्यान, या परीक्षेमुळे रविवारची सुटी असून देखील परीक्षा केंद्र असलेल्या शाळा, महाविद्यालयांचा परिसर परीक्षार्थींच्या गर्दीने फुलून गेला.
...................

आकलनावर आधारित प्रश्‍नांवर भर

या संयुक्त पूर्व परीक्षेतील दोन्ही पेपरमध्ये आकलनावर आधारित प्रश्‍नांवर आयोगाने भर दिला होता. संदर्भ पुस्तकांच्या माध्यमातून ज्या उमेदवारांनी तयारी केली, त्यांना पेपर चांगले गेले आहेत. या परीक्षेतील प्रश्‍नांचे स्वरूप लक्षात घेवून विद्यार्थ्यांनी ‘रेडी नोट्स’ पेक्षा संदर्भ पुस्तकांच्या वाचनातून तयारी करणे आवश्‍यक असल्याची प्रतिक्रिया स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक जॉर्ज क्रूझ यांनी व्यक्त केली.