अल्पवयीन मुलीला पळवल्या प्रकरणी गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीला पळवल्या प्रकरणी गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीला पळवून
नेल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा

कोल्हापूर ः अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी इमदाद बशीर नायकवडी (वय २२, रा.नेहरू नगर शाळेच्या पाठीमागे) याला रविवारी करवीर पोलिसांनी अटक केली. त्याला ३ दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीला इमदादने पळवून नेले होते. याची माहिती मुलीच्या घरच्यांना कळाल्यावर त्यांनी याबाबतची तक्रार पोलिसांत दिली. पोलिसांनी इमदादला ताब्यात घेऊन मुलीची सुटका केली. या प्रकरणी त्याच्यावर बाल लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी एका राजकीय नेत्याने मुलीच्या आईवर तक्रार न देण्यास दबाव आणल्याची पोस्ट सोशल मिडीयावरून पसरवली गेली. या पोस्टची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करणारा तक्रार अर्ज काही जणांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com