गडहिंग्लज गुरव समाज सुकाणू समितीची निवड

गडहिंग्लज गुरव समाज सुकाणू समितीची निवड

गडहिंग्लज गुरव समाज
सुकाणू समितीची निवड
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ५ : तालुक्यातील गुरव समाजातील भाऊबंद व देवस्थान पुजारी, पंच कमिटी यांच्या अडचणी सोडवण्यासाठी गडहिंग्लज तालुका गुरव समाजातर्फे ज्येष्ठ व्यक्तींची सुकाणू समिती स्थापन केली.
विठ्ठल मंदिरात झालेल्या बैठकीत समितीची कार्यकारिणी निवडली. समितीमध्ये निजगुणी स्वामी (गडहिंग्लज), विश्वनाथ गुरव (भडगाव), सुभाष गुरव (नरेवाडी), सदाशिव गुरव (गडहिंग्लज), रमेश गुरव (माद्याळ कसबा नूल), गुरुप्रसाद गुरव (नुल) बी. के. गुरव (नुल), सुनील गुरव (गडहिंग्लज), बाबुराव गुरव (बेकनाळ), जी. के. गुरव (चिंचेवाडी), शंकर गुरव (बसर्गे), गजानन गुरव (भडगाव), निरंजन गुरव (मुगळी), रमेश गुरव (कौलगे) यांचा समावेश आहे. अजित गुरव यांनी सूचक तर श्रीपाद स्वामी यांनी अनुमोदन दिले. गुरव समाजातील दहावी व बारावीमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचे नियोजन केले. गुरव समाजासाठी पतसंस्था स्थापन करणे, समाजातील अडीअडचणी सोडवणे यावर चर्चा केली. नंदकुमार गुरव यांनी वीरभद्र पतपेढी संस्थेची माहिती दिली. सातलिंग गुरव यांनी स्वागत केले. अध्यक्ष अनिल गुरव यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com