बलकवडे प्रेस

बलकवडे प्रेस

07375

शहरवासीयांना अधिकाधिक सुविधा
देण्याचा प्रयत्न केला ः बलकवडे

कोल्हापूर, ता. ५ ः कोरोना, महापूर यासारख्या मोठ्या आपत्तींमध्ये शहरवासीयांसाठी जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न केला. शिवाय थेट पाईपलाईन, अमृत एक, प्रधानमंत्री आवास योजना, कर्मचारी आकृतीबंधाची फेररचना, ई-गर्व्हनन्स अशी शहरासाठी, नागरिकांसाठी आवश्‍यक कामे मार्गी लावली. त्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तसेच शहरवासीयांनीही साथ दिली. त्यामुळे येथील कालावधी कायम स्मरणात राहील, अशा भावना प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी व्यक्त केल्या.
आज महापालिकेत झालेल्या निरोप समारंभापूर्वी पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, ‘अमृत दोन योजनेचे आराखडे मंजुरीसाठी पाठवले आहेत. बृहत आराखड्याची फेररचना करून नवीन पदनिर्मिती मंजुरीसाठी पाठवली आहे. त्यामुळे भविष्यात नवीन पदे भरता येणार आहेत. त्याशिवाय आणखी काही पदभरतीला मंजुरी मिळाली आहे. सातवा वेतन आयोग लागू करण्याबरोबरच पदोन्नतीही दिली आहे. घरफाळ्याचे उत्पन्न वाढवले असून, शासनाच्या विविध योजना राबवण्यातही महापालिकेने इतर महापालिकांपेक्षा चांगले काम केले आहे. आरोग्य योजनांमध्येही काम केले आहे. कोरोना लसीकरणही चांगल्या प्रमाणात झाले. नगररचना, परवाना, इस्टेट विभागाचे कॅम्प घेतल्याने तेथील अनेक प्रलंबित प्रश्‍न निकाली काढले.’
डॉ. बलकवडे म्हणाल्या, ‘दोन वर्षात प्रत्येकी २५ ते २४ कोटी निधी रस्त्यासाठी वापरला आहे. त्यात स्वनिधी तसेच शासनाच्या निधीचा समावेश आहे. तसेच सीएनजीचे नवीन ६५ टिप्पर येत आहेत. टर्न टेबल लॅडर, जेसीबी, पोकलॅन घेतले आहेत. ई-गर्व्हनन्समधून नवीन सुविधा देण्यास सुरूवात केली आहे. प्रशासकपदाच्या कालावधीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचून महापालिकेच्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला. लोकांनी भरपूर सहकार्य केले.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com