महापालिका पर्यावरण दिन

महापालिका पर्यावरण दिन

07326
ई-वेस्ट कचरा संकलन केंद्रांचे उद्‍घाटन
कोल्हापूर, ता. ५ ः महानगरपालिकेच्यावतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चार विभागीय कार्यालयांत ई वेस्ट कचरा संकलन केंद्राचे उद्‍घाटन करण्यात आले. तसेच प्रत्येक वॉर्डमध्ये आरोग्य विभागामार्फत स्वच्छता मोहीम राबवून प्रतिज्ञा घेण्यात आली.
दुधाळी पॅव्हेलियन येथे अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांच्या हस्ते व वृक्षप्रेमी संस्थेच्या सहकार्याने देशी प्रजातीच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. आयटी असोसिएशन व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ई वेस्ट कचरा संकलन केंद्राचे उद्‍घाटन केले. कचऱ्यावर शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावली जाणार आहे. सायबर कॉलेज, पर्यावरणशास्त्र विभाग व चिकोत्रा शिक्षण संस्था संचलित आदर्श प्रशाला यांच्या सहकार्याने पोस्टर स्पर्धा घेतली. शिवाजी विद्यापीठ पर्यावरणशास्त्र विभागाने पर्यावरणीय विषयावर चित्रकला स्पर्धा झाली. विद्यार्थ्यांना पर्यावरण शास्त्र संग्रहालय, रेशीम शास्त्र प्रयोगशाळा, लिड बोटॅनिकल गार्डन व विद्यापीठ परिसरातील तलावाच्या ठिकाणी भेट देवून जलसंवर्धन व प्लास्टिकमुळे होणारे परिणाम या विषयावर माहिती देण्यात आली.
मेरा लाईफ मेरा शहर अंतर्गत नागरिकांच्या सहभागातून प्रत्येक वॉर्डमध्ये आरोग्य विभागामार्फत स्वच्छता मोहीम राबवून प्रतिज्ञा घेण्यात आली. पारी असोसिएशनने वृक्षांचे रोप वाटप करण्यात आले. वृक्षप्रेमी संस्थेचे अमोल बुढ्ढे, डॉ. आसावरी जाधव, प्रताप पाटील, राहुल मेंच, रणजीत नार्वेकर, समीर व्याघ्रांबरे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com