कृषी पर्यवेक्षक सुरेश गुरव यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृषी पर्यवेक्षक सुरेश गुरव यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार
कृषी पर्यवेक्षक सुरेश गुरव यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार

कृषी पर्यवेक्षक सुरेश गुरव यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार

sakal_logo
By

कृषी पर्यवेक्षक गुरव यांचा
निवृत्तीनिमित्त सत्कार
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ८ ः शेती आणि शेतकरी यांच्याशी त्यांची नाळ कायम राहिली आहे. कृषी विभागात नोकरी करीत असताना त्यांनी शेतकऱ्यांचे हित जपले. त्यांनी शेतकरीभिमुख काम केले, असे गौरवोद्‌गार कृषी पर्यवेक्षक सुरेश गुरव यांच्याविषयी आजरा तालुका कृषी अधिकारी के. एन. मोमीन यांनी काढले.
साळगाव (ता. आजरा) येथे नुकतेच निवृत्त कृषी पर्यवेक्षक सुरेश गुरव यांचा शुभेच्छा व निवृत्ती कार्यक्रम झाला. श्री. मोमीन यांच्या हस्ते श्री. गुरव व त्यांच्या पत्नी गीता यांचा सत्कार झाला. माजी सभापती भिकाजी गुरव, सेवा संस्थेचे अध्यक्ष आनंदराव कुंभार, माजी सरपंच बाबासो पाटील, सरपंच धनंजय पाटील, कृषी अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवडे, विजयसिंह दळवी उपस्थित होते. पंचायत कृषी अधिकारी सुधाकर खोराटे, एकनाथ माने, सी. डी. सरदेसाई, मनोहर पाटील, जितेंद्र भोसले, मधुकर कुंभार, बाळू व्हळतकर, राजाराम कुंभार, पंकज गुरव आदी उपस्थित होते. पांडुरंग शिप्पूरकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले आणि आभार मानले.