
भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी
ajr58.jpg....
07325
आजरा ः नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी राकेश चौगुले यांना संभाजी पाटील यांनी निवेदन दिले. या वेळी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
--------------------------------
भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी
आजरा ः शहरामध्ये सध्या भटकी कुत्री, जनावरे यांचा वावर वाढला आहे. त्याचा त्रास शहरातील नागरिकांना होत आहे. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आजरा तालुका उध्दव ठाकरे गट शिवसेनेच्यावतीने केली आहे. आजरा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे. प्रशासकीय अधिकारी राकेश चौगुले यांनी निवेदन स्वीकारले. आठ दिवसांत याबाबत हालचाल झाली नाही तर ही कुत्री नगरपंचायत कार्यालयात सोडली जातील, असा इशाराही दिला आहे. युवासेना उपजिल्हा प्रमुख महेश पाटील, शिवसेना शहर प्रमुख ओंकार माद्याळकर, युवा सेना शहरप्रमुख रोहन गिरी आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.