Wed, October 4, 2023

काँग्रेस श्रध्दांजली
काँग्रेस श्रध्दांजली
Published on : 5 June 2023, 3:05 am
07350
...
रेल्वे अपघातातील मृतांना काँग्रेसची श्रध्दांजली
कोल्हापूर ः बालासोर (ओडीसा) येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या रेल्वे अपघातातील मृतांना काँग्रेसच्यावतीने रेल्वे स्थानकावर मेणबत्ती लावून श्रध्दांजली वाहण्यात आली. जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या सूचनेनुसार हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी अपघातात ठार झालेल्यांना श्रध्दांजली तर जखमी लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी सरलाताई पाटील, भारती पोवार, संजय पोवार-वाईकर, प्रदीप चव्हाण, विक्रम जरग, महंमद शरीफ शेख, रंगराव देवणे, उदय पोवार, वैशाली महाडिक, संध्या घोटणे, हेमलता माने, आनंदा करपे, रोहित गाडीवडर, मतीन शेख, संपत पाटील, निर्मला सालधाना आदी उपस्थित होते.