शासकीय तंत्रनिकेतनच्या प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शासकीय तंत्रनिकेतनच्या प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ
शासकीय तंत्रनिकेतनच्या प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ

शासकीय तंत्रनिकेतनच्या प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ

sakal_logo
By

शासकीय तंत्रनिकेतनच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

२१ जूनपर्यंत स्वीकारणार ऑनलाईन अर्ज

कोल्हापूर, ता. ५ ः शासकीय तंत्रनिकेतनच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असून २१ जूनपर्यंत प्रवेश अर्ज स्वीकारले जणार आहेत. १० वी आणि १२ वी विज्ञान परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. तसेच आय.टी.आय, १२ वी एम.सी.व्ही.सी झालेले विद्यार्थीही अर्ज करू शकतात. अशी माहिती प्रभारी प्राचार्य श्रीकांत नाईक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
नाईक म्हणाले, ‘शासकीय तंत्रनिकेतनकडे विद्यार्थ्यांच्या ओघ वर्षागणिक वाढत आहेत. यंदा विविध विद्याशाख्यांच्या ७०० जागा आहेत. प्रत्यक्ष प्रक्रियेला सुरुवात झाली असून २१ जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे. २३ जून रोजी पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. त्यातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी २४ ते २७ जून हा कालावधी आहे. २९ जूनला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर प्रवेश फेऱ्या सुरू होतील. शासकीय तंत्रनिकेतनमध्ये टी.एफ.डब्ल्यू.एस आणि आर्थिक मागास गटातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात सवलत आहे. त्यांच्यासाठी राखीव कोटा आहे. तसेच आरक्षणनिहाय देखील जागा उपलब्ध आहेत. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घ्यावा.’
या पत्रकार परिषदेला प्रवेश समिती प्रमुख महादेव कागवाडे, समिती सदस्य शितल खोत, शैलजा संकपाळ, मेहजबीन म्हैशाळे, दत्ता सुतार आदी उपस्थित होते.
----
अभ्यासक्रम जागा
सिव्हिल इंजिनिअरिंग १५०
मेकॅनिकल इंजिनिअरिंग १८०
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ६०
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ६०
मॅटॅलर्जिकल इंजिनिअरिंग ४०
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग १२०
-----------

वसतीगृहाची सुविधा

शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मुले आणि मुली यांच्यासाठी स्वतंत्र वसतीगृहाची व्यवस्था असून या वर्षीपासून तेथे जेवणाचीही सुविधा दिली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.