एम.आय.डी.सी. भागातील गावांमध्ये स्वच्छता

एम.आय.डी.सी. भागातील गावांमध्ये स्वच्छता

फोटो
...

एमआयडीसी भागातील गावांमध्ये स्वच्छता

कोल्‍हापूर :जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मंगळवारी (ता.५) जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनमार्फत जिल्ह्यातील एम.आय.डी.सी. हद्दीलगतच्या गावांमध्ये सकाळी ७ ते ९ या वेळेत स्‍वच्‍छता मोहिम राबवण्यात आली. यावेळी परिसरातून प्लास्टीक कचरा संकलनासह परिसराची स्वच्छता करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील औद्योगिक विकास महामंडळाच्या हद्दीलगत असणाऱ्या १५ ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता श्रमदानाचे आयोजन करण्यात आले.जिल्ह्यातील शिरोली पु., गोकुळ शिरगाव आणि कागल या तीन औद्योगिक विकास महामंडळाच्या हद्दीलगतच्या ग्रामपंचायतींच्या ज्या भागामध्ये कचऱ्याचे प्रमाण जास्त आहे, अशी ठिकाणे स्वच्छता श्रमदानासाठी निश्चित करण्यात आली होती. यावेळी ग्रामपंचायतीमार्फत स्वच्छता साहित्य आणि कचरा संकलनासाठी वाहनांची उपलब्धता करण्यात आली होती. करवीर तालुक्यातील गोकुळ शिरगाव, कणेरी, कणेरीवाडी, हलसवडे, नेर्ली, तामगाव, शिये तसेच हातकणंगले तालुक्यातील शिरोली पु., नागाव, टोप, तिळवणी, पट्टणकोडोली, तळंदगे तर कागल तालुक्यातील कसबा सांगाव, रणदेवीवाडी या गावांमध्ये स्वच्छता श्रमदान उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी, तरूण मंडळे, महिला तसेच ग्रामस्थ यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com