शिवराज्याभिषेक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवराज्याभिषेक
शिवराज्याभिषेक

शिवराज्याभिषेक

sakal_logo
By

7358, 7359
...

शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी शहर शिवमय

मराठा महासंघातर्फे भव्य मिरवणूकः नवीन राजवाड्यावरही विविध कार्यक्रम


कोल्हापूर, ता. ५ ः छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४९ वा राज्याभिषेक सोहळा उद्या (मंगळवारी) सर्वत्र विविध उपक्रमांनी साजरा होणार आहे. त्यासाठी शहर सज्ज झाले असून छत्रपती शिवाजी महाराज चौक, निवृत्ती चौक येथील शिवाजी महाराजांचे पुतळे विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहेत. दरम्यान, भव्य मिरवणुकीबरोबरच व्याख्याने, प्रबोधनपर उपक्रम आदी कार्यक्रम दिवसभर होणार आहेत.
नवीन राजवाड्यावर सकाळी साडेसात ते दहा या वेळेत राजवाडा परिसरात विविध कार्यक्रम होणार आहेत. सकाळी साडेसातला सनई चौघडा वादन, आठला झांजपथकाचे सादरीकरण, साडेआठला मराठा लाईट इन्फंट्री बॅंडचे सादरीकरण, नऊला छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण मुर्तीवर अभिषेक, सव्वानऊला पोवाड्याचे सादरीकरण, साडेनऊला शौर्य गीत, पावणेदहाला मराठा स्फूर्ती गीत आणि त्यानंतर मर्दानी खेळ सादर होतील. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, याज्ञसेनीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, यशस्विनीराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती असेल.
अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे सायंकाळी पाचला मंगळवार पेठेतून शिवराज्याभिषेक मिरवणुकीला प्रारंभ होईल. करबल पथकाद्वारे शिवरायांना मानवंदना दिली जाणार असून पाचशे वारकऱ्यांसह पांरपरिक वेशभूषेत महिलांचा सहभाग असेल. खंडोबा-वेताळ मर्दानी खेळ पथक युद्धकलेची प्रात्यक्षिके यावेळी सादर होणार असून बारा बलुतेदारांचा मिरवणुकीत सहभाग असेल.
..........

भव्य आतषबाजीही

मंगळवार पेठेतील शिवालय भजनी मंडळ तथा राधाकृष्ण सत्कार्य संवर्धन मंडळातर्फे खासबाग चौकात राज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मंगळवारी (ता.६) सायंकाळी साडेसहा वाजता श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते शिवप्रतिमा पूजन होईल. त्यानंतर आतषबाजी आणि रात्री नऊला प्रसाद वाटप होईल. निवृत्ती तरूण मंडळ, निवृत्ती चौक रिक्षा मित्र मंडळातर्फे छत्रपती शिवाजी पेठ शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा होत आहे. मंगळवारी (ता.६) सकाळी साडेसात वाजता शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक, दहा वाजता प्रसाद वाटप होईल. रात्री साडेनऊला भव्य आतषबाजी होईल.