अभ्यासक्रम निवडताना भविष्यातील संधींचा विचार करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभ्यासक्रम निवडताना भविष्यातील संधींचा विचार करा
अभ्यासक्रम निवडताना भविष्यातील संधींचा विचार करा

अभ्यासक्रम निवडताना भविष्यातील संधींचा विचार करा

sakal_logo
By

07334

अभ्यासक्रम निवडताना संधींचा
विचार कराः डॉ. सौरभ जोशी

‘मॉब टेंडन्सी’तून बाहेर पडा

कोल्हापूर, ता. ५ ः ‘मॉब टेंडन्सी’तून बाहेर पडून भविष्यातील स्पर्धा आणि संधी यांचा विचार करून विद्यार्थ्यांनी करिअर घडविण्यासाठी अभ्यासक्रमाची निवड करावी. तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्यावा, असे आवाहन केआयटी कॉलेजमधील प्राध्यापक डॉ. सौरभ जोशी यांनी सोमवारी येथे केले. सकाळ एज्युकेशन महायात्रेत त्यांनी ‘पर्यावरण, स्थापत्य व जैवतंत्रज्ञान अभियांत्रिकी ः शाश्‍वत भविष्य व अमर्याद संधी’ याविषयावर मार्गदर्शन केले. स्मार्ट सिटी, इंटिग्रेडेट वेस्ट मॅनेजमेंट, अर्बन सॅनिटेशन आदी क्षेत्रामध्ये भविष्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. ज्येष्ठ संशोधक डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला पूरक ठरणाऱ्या शाखांमध्ये पर्यावरण, स्थापत्य आणि जैवतंत्रज्ञान अभियांत्रिकी महत्त्वाचे असल्याचे विचार मांडले आहेत. शाश्‍वत विकासासाठी आगामी काळात या शाखा अधिक उपयुक्त ठरणार आहेत. त्यामुळे आपल्या देशासह जगभरात या शाखांमध्ये भविष्यात मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यात सल्लागार, प्राध्यापक, शासकीय विभाग अथवा खासगी कंपन्यांमध्ये अभियंता म्हणून काम करता येणार आहे. त्याचा विचार विद्यार्थी आणि पालकांनी करावा, असे आवाहन डॉ. जोशी यांनी केले. त्यांनी केआयटी कॉलेजमधील अभियांत्रिकीतील विविध अभ्यासक्रम, शैक्षणिक सुविधांची उपस्थितांना माहिती दिली.

डॉ. जोशी म्हणाले...
*करिअरबाबत मोठे स्वप्न बघा
*कामाचे समाधान मिळाले पाहिजे ते लक्षात ठेवा
*यशाचे शिखर टप्प्याटप्याने गाठा, त्यासाठी घाई करू नका
*इंजिनिअरींगमधील कोअर, सर्किट ब्रँचेसची माहिती जाणून घ्या