पंचगंगा प्रदूषणप्रश्नी लोकचळवळ

पंचगंगा प्रदूषणप्रश्नी लोकचळवळ

ich61.jpg
07460
इचलकरंजी ः प्रांत कार्यालयात पंचगंगा प्रदुषणप्रश्नी बैठकीत प्रांताधिकारी मौसमी चौगुले - बर्डे यांनी मार्गदर्शन केले.
---
पंचगंगा प्रदूषणप्रश्नी लोकचळवळ
इचलकरंजी येथील बैठकीत निर्णय; जन आयोगात इच्छुकांना संपर्काचे आवाहन
इचलकरंजी, ता. ६ ः पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी लोक चळवळ निर्माण करण्याचा निर्णय येथील समाजावादी प्रबोधिनीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी जनआयोग गठीत करण्यासाठी ही बैठक झाली. अध्यक्षस्थानी प्रांताधिकरी मोसमी चौगुले-बर्डे होत्या.
पंचगंगा प्रदूषित घटकांचा शोध घेणे, कारणे शोधून उपाययोजना करणे, राज्य व केंद्र सरकारकडे नदी स्वास्थ टिकवण्यासाठी प्रयत्न करून पर्यावरण समस्या सोडवण्याच्या उद्देशाने ठोस कार्य करणे आदी निर्णयही घेतले. अरविंद धरणगुत्तीकर, संदीप चोडणकर, रवी जावळे उपस्थित होते.
प्रांताधिकारी चौगुले- बर्डे म्हणाल्या, ‘इचलकरंजीमध्ये प्रदूषणमुक्तीचे कार्य अजून वाढले गेले पाहिजे. प्रत्येक घटकापर्यंत या गंभीर बाबीची तीव्रता समजली पाहिजे. पंचगंगा प्रदूषण मुक्त करणे हे प्रत्येक नागरिकांपर्यत रुजत नाही, तोपर्यंत कार्यकर्त्यांनी थांबू नये. या वर्षाची जागतिक पर्यावरण दिनाची थीम प्लास्टिक प्रदूषणावर आहे. आपण आता निर्धारपूर्वक प्लास्टिक वापराबरोबरच इतर हानिकारक सवयींना नकार दिला पाहिजे.’
पर्यावरण तज्ञ चोडणकर म्हणाले, ‘केंद्रीय प्रदूषण मंडळाने जारी केलेल्या प्रदूषित नद्यांच्या सुचीमध्ये पंचगंगेचे नाव नाही, हे आश्चर्यकारक आहे. येथे कावीळनंतर पंचगंगेचे पाणी नाकारले. आता तर जलपर्णीची वाढ होत आहे. तरीसुद्धा शासकीय पातळीवर नदी प्रदूषणाची गांभीर्यता नाही. त्यासाठी राजेंद्रसिंह राणांनी सांगितल्याप्रमाणे जन आयोग नेमून जनसुनावणी करणे गरजेचे आहे. त्यांनी सांगितलेल्या पर्यावरणाची पंचसूत्री अवलंबून नदी अमृतवाहिनी करण्यासाठी जनरेटा उभा करणे आवश्यक आहे.’
विश्वास बालिघाटे, सुनील बारवाडे, दत्ता माने, रिटा रॉड्रीग्ज, सुषमा साळुंखे, बजरंग लोणारी, राजन मुठाणे, शोभा इंगळे यांनी मनोगत व्यक्त केले. अभिमन्यू कुरणे, प्रा. रमेश लवटे, अन्वर पटेल, राजू कोन्नुर, सदा मलाबादे, उदयसिंह निंबाळकर, अरुण दळवी, अनिता दळवी आदी उपस्थीत होते. जन आयोगात काम करू इच्छिणाऱ्या पर्यावरणप्रेमी नागरिकांनी इचलकरंजी पंचगंगा नदी प्रदूषणमुक्ती समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com