स्नेहमेळाव्यातून वेगळा आनंद मिळतो

स्नेहमेळाव्यातून वेगळा आनंद मिळतो

gad63.jpg
07473
मुगळी : स्नेहमेळाव्यानिमित्ता न्यू इंग्लिश स्कूलच्या १९९५ च्या बॅचमधील माजी विद्यार्थी प्रशालेत एकत्र आले.
-----------------------------------------------------
स्नेहमेळाव्यातून वेगळा आनंद मिळतो
गुरुसिद्धेश्‍वर स्वामी; मुगळीत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
सकाळ वृत्तसेवा
नूल, ता. ६ : केवळ आपल्या कुटूंबासोबतच घरात आनंद मिळतो असे नाही. स्नेहमेळाव्यातूनही आनंद प्राप्त होतो. स्नेहमेळाव्यामध्ये राग नसतो तर प्रेम अधिक असते, असे प्रतिपादन सुरगीश्‍वर मठाचे श्री गुरुसिद्धेश्‍वर महास्वामींनी केले.
मुगळी (ता. गडहिंग्लज) येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या १९९५ मधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. एन. डी. पानारी अध्यक्षस्थानी होते. स्नेहमेळाव्यात शाळेतील आठवणींना उजाळा देत २८ वर्षांनी भेटलेले मित्र मैत्रिणी सुख-दुःखावर संवाद साधला.
दुडांप्पा पाटील, सचिन शिंदे, भरमगोंडा पाटील, सुभाष चौगुले, शिवगोडा पाटील, सुनिल कांबळे, सुनिता शिवारे, संगिता मुसळे यांच्या पुढाकाराने हा मेळावा झाला. एस. टी. पानारी यांचे भाषण झाले. विद्यार्थ्यानी शाळेसाठी पाच सिलिंग फॅन भेट दिले. शिक्षकांचा सत्कार झाला. इब्राहिम काझी, मल्लाप्पा खवरे, विमल चिगरे, अशोक कांबळे, पी. बी. आरबोळे आदी उपस्थित होते. सतीश आरबोळे यांनी स्वागत केले. शिवानंद डोणवाडे यांनी प्रास्ताविक केले. आप्पासाहेब जाधव यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com