
शेवगा महोत्सव
07687
कोल्हापूर ः महिला बचत गटांसाठी घेतलेल्या शेवगा संवर्धन महोत्सवात सहभागी महिला व अधिकारी.
शेवगा संवर्धन महोत्सव उत्साहात
कोल्हापूर, ता. ६ ः महापालिकेच्या दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व निसर्ग मित्र परिवारामार्फत महिला बचत गटांसाठी शेवगा पदार्थांचे ‘शेवगा संवर्धन महोत्सव’ घेण्यात आला.
महिला बचत गटांची स्थापना करून सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले जातात. मृगनक्षत्रावर होणारे वातावरण बदलाना सामोरे जाण्यासाठी मानवी रोगप्रतिकारक शक्ति वाढावी यासाठी उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगा संवर्धन महोत्सवाचे आयोजन केले होते. सोनचिरेया शहर उपजीविका केंद्रात शेवग्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवून आणले होते. त्यात शेवग्याची भाजी, पनीर, कोशिंबीर, भजी, आमटी, वडी, पुरी, पराठा, खाकरा अशा पदार्थांची रेलचेल होती. निसर्ग मित्रचे अनिल चौगुले यांनी शेवग्याचे महत्व, फायदे याबद्दल मार्गदर्शन केले. बचत गटांच्या माध्यमातून प्रसार होऊन आरोग्यदायी शेवग्याचे महत्व सर्वांना समजावे अशा भावना उपायुक्त दरेकर यांनी व्यक्त केल्या. या स्पर्धेत रुक्मिणी शिंदे यांनी प्रथम तर सारिका भोईटे व अनिता जाधव यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. उपायुक्त दरेकर यांच्या हस्ते बहुगुणी शेवगा पुस्तके बक्षीस देण्यात आले. यावेळी रोहित सोनुले, स्वाती शाह, अंजणी सौंदलगेकर, अनिता गवळी, वृषाली चौगले, अश्विनी चुयेकर उपस्थित होते. पावसाळ्यात शेवगा पदार्थांचा आस्वाद शहरवासीयांना घेता यावा यासाठी लवकरच शेवगा खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.