
आजरा ः पोलीस वृत्त
आजऱ्यात मारहाणप्रकरणी
परस्परविरोधी तक्रारी दाखल
आजरा ता. ६ : आजऱ्यातील मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रार दाखल झाल्या आहेत. एसटीचे चालक रवींद्र रामचंद्र मगदूम (रा. पिंपळगाव, ता. भुदरगड) यांनी सात जणानी मारहाण केल्याची तक्रार दिली आहे. यावरून सात जणांवर गुन्हा नोंद झाला आहे. सोमवार सायंकाळी साडे सहावाजता आजरा गडहिंग्लज मार्गावर सोहाळे फाट्यावर हा प्रकार घडला आहे. मगदूम यांनी आजरा पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, गडहिंग्लजहून ते आजऱ्याकडे एसटी (क्रमांक एमएच ०६एस ६५२४) घेऊन येत होते. सोहाळे फाट्यावर समोरून येणाऱ्या चारचाकी गाडीला (एमएच ४६एपी २७३७) पाठीमागून एसटी घासली. यामुळे चारचाकी गाडीतील सात जण एसटी चालक केबीनमध्ये घुसले व लाथा बुक्यांनी मारहाण करू लागले. मला सोडवण्याकरता आलेल्या वाहक कौस्तुभ चौगुले यांनाही त्यांनी लाथा बुक्यांनी मारहाण केली. याबाबत रोशन राऊत, अजिंक्य भिकोट, प्रवीण गिध, अजित भोईर, राहुल राऊत, किशोर भोईर व मिलिंद पांगत सर्वजण रा. मोहपाडा रसायनी (ता. खालापूर, जि. रायगड ) यांच्यावर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. रोशन बाळाराम राऊत यांनीही आजरा पोलिसात तक्रार दिली आहे. चालक, वाहक व अनोळखी दहा पंधरा जणांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. पोलिस अमलदार चेतन घाटगे तपास करीत आहेत.