
घरफाळा सर्व्हे सुरू
शहरातील मिळकतींचा
आजपासून सर्व्हे
कोल्हापूर. ता. ६ : घरफाळा विभागाकडून तब्बल २० वर्षानंतर उद्यापासून (ता. ७) शहरातील मिळकतींचा प्रत्यक्ष सर्व्हे सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी २१ पथके तयार केली आहेत. तसेच ५० अधिकारी-कर्मचाऱ्यांचे नियोजन केले आहे.
या अंदाजपत्रकामध्ये संपुर्ण शहराचा सर्व्हे करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्याप्रमाणे चार विभागीय कार्यालयांतर्गत प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्व्हे करण्यात येणार आहे. यामध्ये गांधी मैदान विभागीय कार्यालयाकडून पाच पथके १० कर्मचारी, छत्रपती शिवाजी मार्केट कार्यालयाकडून चार पथके, आठ कर्मचारी, राजारामपुरी कार्यालयाकडून सहा पथके १२ कर्मचारी, ताराराणी मार्केट कार्यालयाकडून सहा पथके १२ कर्मचारी अशी २१ पथके, चार कर अधीक्षक व चार संगणक चालक असे ५० अधिकारी-कर्मचाऱ्यांचे नियोजन केले आहे.
शहरातील सुमारे १,५७,५४७ मिळकतधारकांना पोस्टामार्फत बिले छपाई करुन वितरीत करण्याची कार्यवाही सुरू आहे. ३० जून अखेर ६ टक्के सवलत योजना सुरू आहे. याअंतर्गत २११३७ मिळकतधारकांनी लाभ घेतला आहे. आजअखेर ९ कोटी ३ लाख ४० हजार रक्कम जमा झाली आहे. सर्व्हे अनुषंगाने माहिती संकलित करण्यासाठी येणाऱ्या अधिकारी व कर्मचा-यांना मोजमापे घेण्यास व आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.