मंगलमुर्ती किक्रेट ॲकॅडमी व रमेश कदम किक्रेट ॲकॅडमी विजयी

मंगलमुर्ती किक्रेट ॲकॅडमी व रमेश कदम किक्रेट ॲकॅडमी विजयी

मंगलमुर्ती किक्रेट ॲकॅडमी,
रमेश कदम ॲकॅडमी विजयी
किशोर भोसलेचे नाबाद शतक, स्मित भाटकरच्या ९९ धावा
कोल्हापूर, ता. ६ : कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित व चाटे शिक्षण समुह पुरस्कॄत १४ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत मंगलमुर्ती किक्रेट ॲकॅडमी व रमेश कदम किक्रेट ॲकॅडमी यांनी प्रतिस्पर्धी संघांवर विजय मिळवला.
श्री किक्रेट स्पोर्टस असोसिएशन विरूध्द मंगलमुर्ती किक्रेट ॲकॅडमी यांच्या मध्ये झाला. सामन्यात मंगलमुर्ती किक्रेट ॲकॅडमीने २८३ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलदांजी करताना मंगलमुर्ती ॲकॅडमी ने ३९ षटकांत ५ बाद ३१६ धावा केल्या. यामध्ये किशोर भोसले नाबाद १४१, स्मित भाटकर ९९ धावा केल्या. श्री किक्रेट असोसिएशन कडुन समर्थ जाधव व अबुतालीफ मुल्लणी यांनी प्रत्येकी यांनी प्रत्येकी २ व विनायक गुरवने १ बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना श्री किक्रेट असोसिएशनचा डाव ७ षटकांत सर्वबाद फक्त ३३ धावात संपुष्टात आला. यामध्ये समर्ध जाधवने दुहेरी ११ धावा केल्या. मंगलमुर्ती कडून सुदेश कांबळेने ५ व ओम पाटीलने ४ बळी घेतले. रमेश कदम किक्रेट ॲकॅडमी विरूध्द फायटर्स स्पोर्टस् क्ल्ब यांचे मध्ये सामना झाला. सामन्यात रमेश कदम ॲकॅडमीने ६ विकेटनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना फायटर्स क्लबने २०.५ षटकांत सर्वबाद १०१ धावा केल्या. यामध्ये निरंजन पाटील व मोहीत जाधव यांनी प्रत्येकी १७, श्रेयस लोहार १३, पॄथ्वेश जाधव ११ धावा केल्या. रमेश कदम ॲकॅडमी कडून शोर्य खोडवेने ४, साहील जाधवने ३, सुरजीत हजारेने २ व आर्यन कित्तुरेने १ बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना रमेश कदम ॲकॅडमीने १८.३ षटकांत ४ बाद १०२ धावा केल्या. यामध्ये आर्यन कित्तुरे नाबाद ३३, शोर्य खोडवे १५ धावा केल्या फायटर्स स्पोर्टस् कडुन मोहिते ३, पृध्वेश जाधवने १ बळी घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com