निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

07692
बापूसाहेब भोसले
कोल्हापूर : शिवाजी पेठ येथील बापूसाहेब राजाराम भोसले (वय ८३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी, जावई, नातू असा परिवार आहे.

07690
भारत पोतदार
कोल्हापूर : शेडबाळ येथील भारत रामचंद्र पोतदार (वय ५८) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ७) आहे.

03552
सुनीता एरुडकर
सरवडे : नरतवडे (ता. राधानगरी) येथील सुनीता मधुकर एरुडकर (वय ५३) निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी, सून, दीर, भावजय, नातवंडे, असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या (गुरुवारी) आहे.

08586
सोनाबाई पाटील
घुणकी : पारगाव (ता. हातकणंगले) येथील सोनाबाई दत्तात्रय पाटील (वय ९२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ८) आहे.

00366
पार्वती कोपार्डे
नंदगाव : येथील पार्वती रघुनाथ कोपार्डे (वय १०५ ) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे चार मुलगे, चार मुली, सुना, नातवंडे, पणतवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ८) आहे.

gad611.jpg
07669
गंगूबाई सावंत
गडहिंग्लज : कडगाव (ता. गडहिंग्लज) येथील गंगुबाई तुकाराम सावंत (वय ९७) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, पाच मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. बुधवारी (ता. ७) रक्षाविसर्जन आहे. दै. ‘सकाळ’चे एजंट सहदेव सावंत यांच्या त्या चुलती होत.
--------------------------------------------------------

फोटो क्रमांक : gad612.jpg
07670
भीमाप्पा धनगर
नूल : हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथील माजी ग्राम पंचायत सदस्य भीमाप्पा सिद्धराई धनगर (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, चार मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.

01569
बाजीराव पाटील
सोनाळी ःदेवाळे (ता. करवीर) येथील बाजीराव कृष्णात पाटील (वय ३९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मोठा परिवार आहे.

01567
हौसाबाई बोळावे
सोनाळी ः कोथळी (ता. करवीर) येथील हौसाबाई गणपती बोळावे जाधव (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ८) आहे.

05044
बाजीराव पाटील
कंदलगाव : येथील बाजीराव मल्हारराव पाटील (वय ५५) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ८) आहे.

01585
शांताबाई खाडे
पट्टणकोडोली ः येथील शांताबाई हिंदुराव खाडे (वय ८४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, दोन मुली, सुना, नातसुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरूवारी (ता. ८) आहे.

03217
कोयनाबाई बरगे
शाहूनगर ः बरगेवाडी (ता.राधानगरी) येथील कोयनाबाई धोंडीराम बरगे (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

03366
वंदना हराळे
उजळाईवाडी ः शिवाजी पेठेतील वंदना दिलीप हराळे (वय ६३) यांचे निधन झाले.