इचल : संक्षिप्त

इचल : संक्षिप्त

07795
इचलकरंजी : छत्रपती शाहू हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.


छत्रपती शाहू हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा सत्कार
इचलकरंजी : एसएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रधान सचिव विकास खारगे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून नापास झालेल्यांना पुन्हा शाळेत बोलवून फेरपरीक्षेची तयारी करून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या. महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख, प्रांताधिकारी मौसमी चौगुले (बर्डे), उल्हास पुजारी, मुख्याध्यापक शंकर पोवार, सहायक पोलिस निरीक्षक विकास बडवे, वसंत सपकाळे उपस्थित होते.
----------------
मथुरा हायस्कूल सलग चौदाव्या वर्षी शंभर टक्के
इचलकरंजी : येथील मथुरा शिक्षण संस्था संचलित मथुरा हायस्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. गेली १४ वर्षे १०० टक्के निकालाची परंपरा हायस्कूलने यावर्षी देखील अखंडित ठेवली. प्रशालेची विद्यार्थिनी अनुजा अर्जुन पाटील हिने या परीक्षेत तब्बल ९९ टक्के गुण मिळवून शाळेच्या नावलौकिकात भर टाकली आहे. एकूण ९७ विद्यार्थ्यांपैकी तब्बल ५५ विद्यार्थी विशेष प्रावीण्य श्रेणीत पास झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे हिंदुरावजी शेळके, विवेक शेळके, मुख्याध्यापक एस. जी. चव्हाण यांनी अभिनंदन केले.
--------------
दगडूलाल मर्दा वसतिगृहात मोफत प्रवेश
इचलकरंजी : समाजातील वंचित उपेक्षित मागासवर्गीय ५ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना दगडूलाल मर्दा विद्यार्थी वसतिगृहात २०२३-२४ वर्षाकरिता मोफत प्रवेश सुरू करण्यात आला आहे. वसतिगृहात अनुसूचित जाती/जमाती/विमुक्त व भटक्या/विशेषमागास/आर्थिक मागास अशा विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू आहे. वसतिगृहात विद्यार्थ्यांना सकाळी नाष्टा, दोन वेळचे सकस जेवण मोफत, आरोग्य सुविधा, संगणक माहिती, बंक बेड, वॉटर प्यूरिफायर पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे. तरी गरीब व होतकरू विद्यार्थ्यांनी वसतिगृहाचे अधीक्षक अरुण पवार यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com